रिपब्लिकन कामगार आघाडीची रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य नोंदणीत आघाडी
रिपब्लिकन कामगार आघाडीची रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य नोंदणीत आघाडी The Republican Workers Front leads the Republican Party in member registration
मुंबई दि.14 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईत संविधान निवासस्थानी भेट घेऊन रिपब्लिकन कामगार आघाडी चे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य नोंदणीचा 1 लाख 10 हजार रुपयांचा धनादेश रिपब्लिकन पक्षाकडे सुपूर्द केला. यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर उपस्थित होते.
मागील वर्ष भरापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे. राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने सदस्य नोंदणीत दिरंगाई झाल्याचे रिपाइं कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र आता कोरोनाचा कहर मंदावल्यानंतर रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या पक्ष सदस्य नोंदणीला वेग आला आहे. रिपब्लिकन कामगार आघाडीनेही वेगवान रिपाइं पक्ष सदस्य नोंदणी करून नोंदणीचे 1 लाख 10 हजार धनादेश स्वरूपात रिपब्लिकन पक्षाकडे सुपूर्द केले आहेत.रिपब्लिकन कामगार आघाडीने पक्ष सदस्य नोंदणी मोहिमेत आघाडी घेतल्याबद्दल रिपाइं च्या नेतृत्वाने प्रदीप कांबळे यांचे कौतुक केले आहे. कामगार आघाडी ने पक्ष सदस्य नोंदणीत पुढाकार घेतल्याबाबत रिपाइं कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.