आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोविडयोग्य वर्तणूकीचे पालन करणे अतिशय महत्वाचे

आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोविडयोग्य वर्तणूकीचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे – कोविड कार्यकारी समूहाच्या अध्यक्षांनी दिला सावधगिरीचा इशारा

PIB Mumbai ,नवी दिल्ली/मुंबई, 9 सप्टेंबर 2021 –

भारताच्या कोविड -19 राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष (NTAGI)अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी भारताच्या कोविड -19 लसीकरण मोहिमेबाबत दूरदर्शन न्यूजला दिलेल्या मुलाखतीमधील काही महत्वाचे मुद्दे .

प्रश्न – भारतात कोविड -19 ची तिसरी लाट येईल का?

आपल्या देशात गेल्या अनेक आठवड्यांपासून 30,000 ते 45000 इतकी दैनंदिन सरासरी रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. ही संख्या मुख्यतः विशिष्ट भौगोलिक प्रदेशांतून , विशेषत: केरळ, अनेक ईशान्येकडील राज्ये आणि महाराष्ट्रातील काही जिल्हे तसेच काही इतर दक्षिणेकडील राज्यांमधून नोंदवली जात आहे. जर आपण जून, जुलै आणि ऑगस्ट दरम्यान आढळलेल्या SARS-COV-2 विषाणूंच्या जीनोमिक विश्लेषण पाहिले , तर कोणताही नवीन स्वरूपाचा विषाणू आढळलेला नाही. जुलै महिन्यादरम्यान केलेल्या सीरो-सर्वेक्षणाच्या आधारावरून असे लक्षात येते की , ज्यांचे लसीकरण झालेले नाही अशाच रुग्णांना संसर्ग झालेला आढळून आला आहे. दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात हे रुग्ण मुख्यतः प्रभावित झालेले दिसून आले.

जुलै महिन्यात झालेल्या सीरो-सर्वेक्षणामध्ये 66% ते 70% लोकांना संसर्ग झाल्याचे दिसून आले; याचा अर्थ असा आहे,की ज्यांचे लसीकरण अद्याप झाले नसेल असे विशेषतः 30% लोक अजूनही संसर्गप्रवण आहेत आणि ते कोणत्याही वेळी संक्रमित होऊ शकतात. म्हणूनच देशभरात आपल्यापैकी कुणीही हलगर्जीपणा केला तर हे लक्षात घ्यायला हवे की 30% लोकांना अजूनही संसर्ग होऊ शकतो आणि त्यापैकी बरेच गंभीर आजारी होऊ शकतात आणि कदाचित हा संसर्ग अधिक घातक ठरु शकतो आणि या हलगर्जीपणाची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल,याचा अनुभव आपण एप्रिल आणि मे 2021 मध्ये घेतला आहे .

म्हणूनच,विशेष करून येणाऱ्या सणासुदीच्या काळात कोविडयोग्य वर्तणूकीचे अनुसरण करणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे आहे, या वेळी विषाणूचे नव्याने उत्परिवर्तन होणे, हे देखील तिसऱ्या लाटेच्या आगमनाचे कारण असू शकते.

प्रश्न – डेल्टा या विषाणूच्या नव्या प्रकाराविरुद्ध आपली कोविड लस किती प्रभावी आहे? तिसरी लाट टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

कोविड लसींच्या प्रभावाचे स्पष्टीकरण पुढील पद्धतीने केले जाऊ शकते:

संसर्ग रोखण्यासाठी होणारा त्यांचा प्रभाव आणि त्यायोगे विषाणूचा प्रसार टाळणे
संसर्गामुळे होणाऱ्या इतर लक्षणांविरूध्द (आजारांविरुध्द)प्रभाव
संसर्गाची गंभीर लक्षणे किंवा मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी त्याचा प्रभावीपणा
प्रसारमाध्यमांमध्ये आपण ज्या प्रभावीपणाची मूल्ये पाहतो ती मुख्यत्वे रोगाच्या लक्षणांविरूद्ध परिणामकारकतेचा संदर्भ दाखवितात; वेगवेगळ्या लसींसाठी साधारणपणे हा प्रभाव 60-90% असतो.

बहुतेक लसी या कोविड संसर्ग रोखण्यासाठी पुरेश्या प्रभावी नाहीत आणि म्हणूनच लसीकरणानंतरही ती व्यक्ती कोविड संसर्ग पसरवू शकते यावर वारंवार भर दिला जात आहे आणि म्हणूनच कोविड योग्य वर्तन राखण्याची गरज आहे.

कोविड -19 लसींचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे गंभीर रोग टाळण्यासाठी त्यांचा प्रभाव, रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्याची आवश्यकता आणि मृत्यू टाळणे ही आहे. सध्या भारतात आणि इतरत्र उपलब्ध असलेल्या सर्व लसी या लाभार्थ्याला रोगाची गंभीर लक्षणे आणि मृत्यूपासून वाचवण्यासाठी 90-95% पेक्षा जास्त परिणामकारक आहेत. हे तथ्य डेल्टा विषाणूसह सर्व प्रकारांसाठी लागू अपेक्षित आहे. आज भारतात होणारा बहुतेक संसर्ग हा क्रमण डेल्टा या विषाणू प्रकारामुळे होत आहे.

प्रश्न- जर एखादी व्यक्ती कोविड- 19 संक्रमित असेल आणि आता त्याच्या / तिच्या शरीरात कोविड- 19 प्रतिपिंड (अँटीबॉडीज) तयार झाले असेल, तर तो / ती कोविड- 19 ने बाधित नसलेल्या व्यक्तीसाठी रक्तदान किंवा प्लाझ्मा दान करू शकतात का ?

आयसीएमआर अंतर्गत आपल्या देशातील उच्च दर्जाच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, कोविडचा गंभीर संसर्ग असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्यास त्यावेळी प्लाझ्मा उपचारपद्धती उपयुक्त नव्हती. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करणे किंवा मृत्यू रोखणे यातही जगाच्या अन्य भागात अपयश आल्याचे तत्सम अभ्यासात दिसून आले आहे. या कारणांमुळे, आयसीएमआरने कोविड 19 च्या गंभीर संसर्गाच्या उपचार मार्गदर्शक तत्त्वांचा भाग म्हणून प्लाझ्मा उपचारपद्धती काढून टाकली आहे.

असे म्हटले आहे की, जर कोणाला संसर्ग झाला असेल, तर त्याच्या / तिच्या शरीरात पेशींवर आधारित प्रतिकारशक्ती तयार होते. अँटीबॉडीज अर्थात प्रतिपिंड हे मोजता येऊ शकतात आणि त्यांला दृष्यमान प्रतिकारशक्ती असेही म्हटले जाते. पेशीवर आधारित प्रतिकारशक्तीला अदृष्य प्रतिकार शक्ती आणि प्रतिपिंडांइतकेच महत्त्वाचे मानले जाऊ शकते. जेव्हा अशा व्यक्तीला पुन्हा कोविड 19 चा संसर्ग होतो, तेव्हा हे रोग प्रतिकारशक्ती घटक, रोगांना आणि त्याच्या तीव्रतेला अडसर ठरतात.

अलिकडेच एका कंपनीने प्रतिपिंड मिश्रण बाजारात आणले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. हे मिश्रित प्रतिपिंड हे प्लाझ्मा उपचारपद्धतीच्या तत्त्वावर आधारित होते. असे लक्षात आले आहे की, जर रुग्णास पहिल्या आठवड्यात किंवा संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा किंवा अँटीबॉडी (प्रतिपिंड) दिले गेले तर त्याचा काही उपयोग होऊ शकतो.

एका प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, एखाद्याला जर नैसर्गिकपणे संसर्ग होऊन त्याला कोविडची बाधा झाली असेल आणि त्यातून तो बरा झाला, तर त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती त्याचे दीर्घकाळ संरक्षण करू शकते आणि जर एखाद्या परिस्थितीत अशा व्यक्तीने लसीची मात्रा देखील घेतली असेल तर त्या व्यक्तीला रोग आणि त्याच्या संसर्गापासून दुहेरी संरक्षण मिळू शकेल.

प्रश्न-आपल्या नागरिकांना लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता आहे का ?

पाश्चात्य देशांमध्ये बूस्टर डोस बद्दल घेण्यात आलेल्या निर्णयांच्या आधारावर आपल्या देशातील बूस्टर डोसच्या आवश्यक परिस्थितीबाबत ठरविता येत नाही. देशाच्या वेगवेगळ्या भागात अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासावर आधारित असलेल्या पुराव्यांवरून आपल्या लोकांना याची गरज आहे अथवा नाही, याचे मार्गदर्शन मिळेल. जर देशातील एकूण लोकसंख्येच्या 70 % ते 80 % लोक बाधित असतील तर अशा परिस्थितीत ही बाब लक्षात घेतली जाईल. एकणच आपल्या देशातील लोकांना इष्ट असे संरक्षण प्रदान करण्याच्या एकूण उद्दिष्टासह सर्वोत्तम उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल.

प्रश्न –लसीची परिणामकारकता आणि एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या मर्यादा यांचा एकत्रित विचार करावा की त्याचा वेगळ्या दृष्टीने त्याचा विचार झाला पाहिजे ?प्रत्येकाच्या शारीरिक अवस्थेवर संसर्ग अवलंबून असतो का किंवा लसीची परिणामकारकता प्रत्येकासाठी समान असते का ?

हे पैलू एकात्मिक पद्धतीने पहायला हवेत. कोविड- 19 च्या प्रतिबंधक लसींसह कोणत्याही लसीसाठी तरूण व्यक्तींचा प्रतिसाद सर्वात परिणामकारक असतो आणि लस देखील त्या ठिकाणी आपला अधिकाधिक प्रभाव दर्शवितात. वाढते वय आणि सहव्याधी असतील तर लसीचा प्रभाव कमी ठरू शकतो. याच कारणासाठी, प्रारंभिक चाचण्यांच्या दरम्यान, ज्येष्ठ अर्थात 60 पेक्षा अधिक वय असलेल्यांचा समावेश असतो. सुदैवाने, कोविड- 19 प्रतिबंधक लसीचा परिणाम सर्वांवर सारखाच झाला. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, कारण ज्येष्ठ व्यक्ती आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींना रोगाचे गांभीर्य आणि मृत्यूचा धोका हा तरूण व्यक्तींच्या आणि सहव्याधी नसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत 20-25 पटींनी अधिक असतो. लस घेणाऱ्यांसाठी लस प्राधान्य यादी तयार करण्यासाठी हाच आधार होता. शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर गंभीर परिणाम करणाऱ्या काही रोगांच्या अवस्था आहेत. उदा.-उपचार घेणारे कर्करोगाचे रुग्ण, स्टीरॉइडची गरज असलेल्या आरोग्य स्थिती. अशा व्यक्तींमध्ये लसींचा संरक्षणात्मक प्रतिसाद अपूरा असू शकतो आणि त्यांना लसीची दुसरी मात्रा किंवा बूस्टर डोसची आवश्यकता भासू शकते. कोविड लसींच्या बूस्टर डोसची गरज ठरविताना एनटीएजीआय कडून या मुद्यांचा नक्कीच विचार होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: