पत्रकार शाहबाज दिवकर हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पत्रकार शाहबाज दिवकर हल्ला प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार Journalist Shahbaz Divkar attack case – Complaint of Patrakar suraksha samiti to Chief Minister
सोलापूर / प्रतिनिधी - राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार शाहबाज दिवकर यांच्यावर डोक्यात बाटली फोडून शस्त्राने वार करून गंभीर जखमी करून प्राणघातक हल्ला केला असून या घटनेचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने निषेध व्यक्त करून पत्रकार शाहबाज दिवकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या अज्ञात गुंडाना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्याबाबत पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले,धमकी, मारहाणीच्या प्रकरणात मोठी वाढ झाली असून बातमी लावण्यावरून प्राणघातक हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी ? असा सवाल राज्य सरकार ला विचारला असून मूठभर पत्रकारांना खूष ठेवून शेकडो प्रामाणिक पत्रकारांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडल्याची बोचरी टीका यशवंत पवार यांनी केली आहे. राज्य सरकार पत्रकारांच्या बाबतीत गंभीर नसल्याचा आरोप केला आहे .

पत्रकार सुरक्षा समितीने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना निवेदन दिले असून कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राज्यसरकारला दिला आहे.

     याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शब्बीर मणियार,शहराध्यक्ष वैजिनाथ बिराजदार, कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी(बी एस),अक्षय बबलाद, इस्माईल शेख ,रोहित घोडके, गिरीश गोसकी, विवेकानंद खेत्री,संतोष खलाटे,प्रदीप पेदापल्लीवार , श्रीनिवास वंगा, हरी भिसे, दत्तात्रय धनके ,अतुल भडंगे, नागनाथ गणपा, श्रीकांत भल्ला आदी पत्रकार उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: