गादेगावमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

गादेगावमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न Bhumi Pujan of various development works completed in Gadegaon
   पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील ग्रामपंचायतच्यावतीने विविध विकास कामांचे उदघाटन पार पडले . दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर असलेल्या अंदाजे 30 लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला . यावेळी गादेगावातील समविचारी आघाडीचे सर्व प्रमुख नेतेमंडळी तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींसह मान्यवर उपस्थित होते.

या दलितवस्ती सुधारणा योजनेअंतर्गत गावठाण दलित वस्ती प्रभाग-5 येथे दहा लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रिटीकरण,कोर्टीरोड कांबळे-मोरे वस्ती प्रभाग -1 येथे पाच लक्ष रुपयांचे रस्ता काँक्रिटीकरण, झिरपीमळा साबळे – लोंढे वस्ती प्रभाग क्र-2 येथे दोन लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रिटीकरण,लक्ष्मीनगर दलित वस्ती प्रभाग-2 येथे आठ लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रिटीकरण,मलिकवस्ती- दलितवस्ती प्रभाग क्र-3 येथे पाच लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रिटीकरण,सातारनाला व्हनकडे वस्ती ते शिवरस्ता दलितवस्ती प्रभाग क्र-4 येथे पाच लक्ष रूपयांचे रस्ता काँक्रिटीकरण व शाळेमागील दलितवस्ती प्रभाग क्र – 4 येथे पाच लक्ष रुपयाचे वस्ती सुशोभीकरण आदि कामांचे भूमिपूजन करण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी गादेगावात परिवर्तन होवून ग्रामपंचायतमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर समविचारी आघाडीची सत्ता आली. त्यानंतर विकासकामांचा झपाटा सुरू झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अनेक महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली,अनेक लोकहिताचे निर्णय घेतले गेले आहेत. गावठाणा प्रमाणे वाड्यावस्त्यांवर देखील विकासाची कामे सुरू आहेत.

गावाच्या विकासासाठी विविध मंडळी एकत्र येत गावाचा चेहरा बदलत आहेत. येत्या काळात वेगाने विकास कामे होवून गादेगावचा विकास होईल अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करत आहेत. या चालू असलेल्या कामांबाबतही गावकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होतील अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: