पंढरपूर तालुक्यात 200 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करणार -चेअरमन कल्याणराव काळे

पंढरपूर तालुक्यात 200 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करणार -चेअरमन कल्याणराव काळे covid Care Center with 200 beds to be started in Pandharpur taluka – Chairman Kalyanrao Kale

पंढरपूर, (प्रतिनिधी), दि.29 – वसंतदादा काळे प्रतिष्ठान मार्फत वेदांत भक्त निवास पंढरपूर येथे 100 बेड व वाडीकुरोली ता.पंढरपूर येथे ग्रामपंचायत स्तरावरील 100 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे मागणी केली असून परवानगी मिळताच शहरी व ग्रामीण भागातील रुग्णासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर माफक दरात कोविड केअर सेंटर सुरू करणार असल्याचे सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले .

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे वेदांत भक्त निवासचा प्रस्ताव
 जनकल्याण हॉस्पिटल पंढरपूर येथे गेल्या 10 महिन्यांपासून कोविड हॉस्पिटल सुरू असून हजारो रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तेथे  45 बेड उपलब्ध आहेत मात्र रुग्ण संख्या वाढली असल्याने बेड उपलब्ध होत नाहीत .यासाठी  आणखी बेड वाढवण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे वेदांत भक्त निवास पंढरपूर येथे 100  बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रस्ताव दिला आहे.  परवानगी मिळताच तेथे 100 बेडचे व वाडी कूरोली येथे 100 बेडचे असे 200 बेड चे  कोविड केअर सेंटर  सुरू करणार आसल्याचे सांगितले.

 पंढरपूर शहर व तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत तसेच 65 एकर,गजानन महाराज मठ येथील कोविड सेंटर मध्ये ही जागा शिल्लक नाही. रुग्ण संख्या दररोज झपाटयाने  वाढत असल्याने ऑक्सिजन  बेड आणि प्राथमिक उपचारासाठी सुद्धा लोकांना वणवण फिरावे लागत आहे.200 बेड चे कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याने प्राथमिक स्तरावर उपचाराची सोय होऊन पंढरपूर शहर व  ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: