वादळी चिमटा …..
वादळी चिमटा …..
ओळखा कोण आहेत ते ?
एका ठिकाणी वस्ती
दुसरीकडे मस्ती
सत्तेबरोबर मतून कुस्ती
म्हणूनच त्यांची सर्वत्र दोस्ती “!!
जगावं कसं…..
जेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा मातीला सुगंध येतो
जेंव्हा ज्ञान प्राप्त होते तेंव्हा जीवन सुगंधीत होते
जेंव्हा स्नेहाचा मळा फूलतो तेंव्हा जगण्यात अर्थ येतो
जेंव्हा प्रेमाचा अर्थ कळतो तेंव्हा सार्थकता प्राप्त होते
म्हणूनच असं जगावं की
पापपुण्य या कल्पनेंच्या बेड्यातुन मुक्त व्हावं
पक्षाप्रमाणे स्वछंदी पण असं जगावं की
देवळातील देवांनी देखील आपलं भक्त व्हावं
गेल्यावर आपलं नांव बसता उठता
सर्वांच्या ओठांवर नांदत राहावं “
“सुप्रभात”
“आपली ओळख आपल्या वर्तनातून होत राहावी “!!
आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००
