सोनांकुर कत्तलखाना वाद पुन्हा उफाळला

सोनांकुर कत्तलखाना वाद पुन्हा उफाळला आंदोलकांना कारवाईचे आश्वासन Protests erupt again over Sonankur slaughterhouse
 कुर्डूवाडी/ प्रतिनिधी - सोनांकुर कत्तलखान्यापासून राष्ट्रीय महामार्गकडे जाण्यासाठी अवैध रस्ता पुन्हा बनवण्यात आल्यानंतर प्राणीमित्र विलास शहा,प्राणी कल्याण अधिकारी केतन शहा, महेश भंडारी , प्रसाद माने, देविदास मेटकरी, सुचित्रा गडदे, आरती मेटकरी, शिवांगी कोचरे, आदींनी दि.६ रोजी रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले , मात्र आंदोलना पूर्वीच पी.एस.आय बालाजी बस्के, नॅशनल हायवे चे परिचलन अधिकारी अनिल विपत यांनी विलास शहा यांचे निवासस्थानी प्रत्यक्ष येवून संबंधित प्रकरणी सात दिवसात कारवाईचे पत्र दिल्याने आंदोलन सात दिवसासाठी स्थगित करण्यात आले आहे. 

    सदर रस्ता दि.२ सप्टेंबर रोजी जेसीबीने बंद केला होता मात्र तो पुन्हा चालू करण्यात आला आहे .त्याचप्रमाणे सदर कत्तलखान्यासाठी देण्यात आलेले एन.ओ.सी बद्दलही आक्षेप घेण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: