सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसीच्यावतीने गाजर दाखवा आंदोलन
सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसीच्यावतीने गाजर दाखवा आंदोलन Carrot show agitation on behalf of Solapur District Congress OBC
पंढरपूर /प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने येथील शिवाजी चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त गाजर दाखवा आंदोलन घेण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी हा देश बेरोजगारीच्या खाईत ढकलला व अदानी अंबानी यांना जवळजवळ विकून टाकला त्यामुळे पंतप्रधानाच्या वाढदिवसा निमित्त गाजर दाखवा आंदोलन करण्यात आले.
नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये सांगितले होते की, जनसामान्यांच्या खात्यामध्ये 1500000 पडतील. 1500000 तर सोडाच त्यांच्या खात्यामध्ये सात वर्षात फुटकी कवडीही आली नाही, त्यांना फक्त गाजर दाखवण्यात आले. देशामध्ये बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील परंतु नोकरी तर सोडाच आहे पण आहेत त्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तसेच महागाई कमी होईल,अच्छे दिन येणार असे सांगत असताना 2013 साली साडेचारशे रुपये असणारा गॅस सिलेंडर आता 1 हजार रुपयाला घ्यावा लागतो आहे ,पेट्रोलचे दर 2013 साली 64 रुपये असताना सात वर्षांमध्ये 110 रुपयांपर्यंत पोहोचले. डिझेलचीही तीच अवस्था आहे . सर्वसामान्य माणसांचे या महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा 17 सप्टेंबर वाढदिवस हा दिवस बेरोजगार दिवस आणि गाजर दाखवा दिवस म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाने उपहासात्मक पद्धतीने गाजर दाखवून आंदोलन करून साजरा करण्यात आला.
यामध्ये सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी अध्यक्ष समीर कोळी, युवक कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, शहराध्यक्ष राजेश भादुले, ब्राह्मण सेल जिल्हाध्यक्ष द बडवे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष सय्यद, माजी शहराध्यक्ष सुहास भाळवणकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष संदीप शिंदे, कृष्णा कवडे, शहर कार्याध्यक्ष सागर कदम, शहर सरचिटणीस बाळासाहेब आसबे, मिलिंद आढवळकर ,देवानंद इरकल, बुवा अधटराव ,नागेश अधटराव, बबलू आधी, रेहान सय्यद,शिवाजी धोत्रे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.