रुग्णालयात जायच्या आधी केलेला घरगुती उपाय म्हणजे प्रथमोपचार खुप महत्वाचा – विवेक परदेशी

रुग्णालयात जायच्या आधी केलेला घरगुती उपाय म्हणजे प्रथमोपचार खुप महत्वाचा – विवेक परदेशी Home remedies before going to the hospital are very important first aid – Vivek Pardeshi
 एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा अचानक काही त्रास उद्भवला,कोणाताही आजार झाला असो अशा व्यक्तींना वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा दवाखान्यामध्ये एँडमीट करेपर्यंत यामधील वेळ खूप मौल्यवान असून या काळामध्ये सदर व्यक्तींना प्रथमोपचार जर दिले तर ते प्रथमोपचार सदर व्यक्तीला संजीवनी ठरु शकतील. उदारणार्थ एखाद्या व्यक्तीला काही जखम झाल्यास, रक्त वाहत असल्यास अशा वेळी आपण त्याला तातडीने दवाखान्यात नेतो पण दवाखान्यात नेण्या आधी प्रथम आपण वाहत असलेले रक्त थांबवतो. एखादी पट्टी जखमेवर बांधून, पाच मिनीटे दाबुन धरुन रक्त थांबवतो, मग तातडीने दवाखान्यात नेतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला कुठलीही समस्या उद्भवल्यास प्रत्येक समस्येमागे,प्रत्येक ज्ञात,अज्ञात आजारामागे विविध प्रकारचे प्रथमोपचार असु शकतात,असतात.आपण स्वतः जाणकार व्यक्तींच्या मदतीने, मार्गदर्शनाने आपण प्रथम उपचार देऊ शकतो. जर उपस्थित व्यक्ती पैकी कोणास सद्यपरिस्थितीत कोणते प्रथमोपचार द्यायचे याबद्दल माहिती नसल्यास आपण आपल्या परिचीत डॉक्टरांचा तातडीने फोन करुन किंवा तज्ञ,जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली प्रथमोपचार माहीती करुन देऊ शकतो.

   प्रथोमोपचार सुरू करताना प्रथम रूग्णाला धीर द्यावा. प्रथमोपचार करतांना आपणास धोका तर नाही ना हे प्रथम तपासा,आवश्यक असल्यास रुग्णवाहिका बोलावण्याची व्यवस्था करावी. श्वासोच्छ्वास तपासणे महत्वाचे आहे.

  "श्वासोच्छ्वास सुरु असेल" तर रुग्णास एका कडेवर झोपवा.बेशुद्ध रुग्णाची जीभ हळू हळू आत सरकून त्याचे श्वासमार्ग बंद होऊ शकतात. जीभ सरळ करुन ते श्वसनमार्ग चालू करा.माहीती पैकी आवश्यक प्रथमोपचार देण्याची सुरुवात करा.

   "श्वासोच्छ्वास बंद असेल" तर त्वरित सदर व्यक्तीस पोटावर करा.रुग्णाच्या तोंडात काही नाही हे पहा.आपणास माहीतीपैकी किंवा तज्ञ व्यक्तींच्या मार्गदशनाखाली प्रथम उपचार द्या.तोंडाने श्वासोच्छ्वास द्या.छातीवर दोन्ही हातानी जोरदार दाब द्यायला सुरुवात करायला हवे,हा क्रम वैद्यकीय मदत मिळेपर्यंत सुरू ठेवावा. लक्षात ठेवा कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि छातीवरचा दाब याद्वारे मानवी शरीर काही काळ जिवंत ठेवता येते. कारण मानवी ह्रदयाला रक्तप्रवाह सुरु राहील आणि त्यातून मेंदूपर्यंत रक्त पोहोचत राहील. यामुळे जीवनासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे अवयव जिवंत राहून प्राण वाचण्याची शक्यता तयार होते.

   "रक्तातील ऑक्सिजन" ची लेवल कमी होत असल्यास,आपणास धाप लागत असल्यास या प्रसंगी तातडीने वैद्यकीय मदत मिळवणे, डॉक्टरांचे मार्गदर्शन औषध उपचार करणे,अँडमीट होणे आवश्यक असते. अशा प्रसंगी सदर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत यामधील मौल्यवान वेळी आपण माहित असलेले, तज्ञाच्या मदतीने ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी प्रथमोपचार करणे फार उपयुक्त आहे. सदर व्यक्तीस जास्तीत जास्त वेळ उलटे झोपवुन, सहज जमेल असे श्वसनाचे "व्यायम, प्राणायाम, मेडीटेशन, अँक्युप्रेशर" असे व्यायाम करता येईल. आपण कोणताही आजार अंगावर काढु नये. फोनवरुन ,"ऑनलाइन" किंवा गरज असल्यास समक्ष जाऊन आपल्या डॉक्टरांचे संपर्कात राहून तपासणी करुन वेळोवेळी न चुकता औषध घ्यावीत.विषेषतः 'दमा,बी.पी.,शुगरच्या, कोमॉरबीड पेशंटने विषेश काळजी घ्यावी.

    कधीही, कोणताही प्रसंग उद्भवला तर पहिल्यांदा आपण मनाने धिट रहायला पाहीजे, गोंधळुन जायला नको, टेंशन घ्यायला नको,धिर धरला पाहीजे,अती घाई करु नये. नेमके काय करावे याचा आपण,आपले घरातील व्यक्ती, आपल्या मदतीला धावणारे मित्र यामध्ये शांतपणे विचार विनमय करून निर्णय आपण घेऊ. वेळप्रसंगी फॅमिली डॉक्टर ,तज्ञ व्यक्ती यांचा सल्ला आपण घेऊन निर्णय घेऊ .

    प्रथमोपचार खुप महत्वाचे असून आपण विविध परिस्थितीत देता येणाऱ्या प्रथम उपचाराचा अभ्यास करणे,माहीती करुन देणे आवश्यक आहे. प्रसंगानुसार प्रथम उपचार विविध असू शकतात. एखाद्या व्यक्तीस लाईटचा करंट बसला, भाजलं गेलं, फिट आली, छातीत दुखू लागल्यास, बेशुद्ध पडल्यास, श्वास घेताना त्रास होऊ लागला, मेंदूला इजा झाली, अपघात झाल्यास, वरून खाली पडल्यास, पाण्यात बुडल्यास अशा वेगवेगळ्या प्रसंगी हे प्रयत्न आपल्या व्यक्तीस निश्चितच संजीवनी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: