पांडुरंग तात्या माने यांच्या पुण्यतिथी निमित्त पूर्णाकृती मूर्ती स्थापना व ऑफिस उद्घाटन

पांडुरंग तात्या माने यांच्या पुण्यतिथी निमित्त पूर्णाकृती मूर्ती स्थापना व ऑफिस उद्घाटन Installation of full size idol and inauguration of office on the occasion of death anniversary of Pandurang Tatya Mane

पंढरपूर /प्रतिनीधी- पै.पांडुरंग तात्या माने यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांची पूर्णाकृती मूर्ती स्थापना व पांडुरंग तात्या माने फाउंडेशन ऑफिसचे उद्घाटन त्यांची पत्नी सुरेखाताई पांडुरंग माने यांच्या हस्ते करण्यात आले अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी दिली.

     पंढरपूरमध्ये लॉकडाउन वेळी पांडुरंग तात्या माने फाउंडेशन तर्फे अन्नदानाचे कार्य सलग शंभर दिवस करण्यात आले . या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम मागील तीन वर्षापासून सुरु आहेत. सुरेखाताई माने यांनी त्यांच्या पतीची पूर्णाकृती मूर्ती स्थापना केली आहे.

  यावेळी गणेश माने ,दिनेश माने व संस्थापक अध्यक्ष निलेश माने बोलताना म्हणाले ,हे ऑफिस नसून आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि इथे समस्या घेऊन येणार्या नागरिकांची अडचण आम्ही नक्कीच दूर करू.

यावेळी उपस्थित अभिजीत पाटील धाराशिव साखर कारखाना चेअरमन, युवा नेते प्रणव परिचारक, धनंजय कोताळकर, अरुण भाऊ कोळी, गणेश अंकुशराव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण पापरकर, रामचंद्र धोत्रे, महेश चव्हाण, अनिल अभंगराव, संजय ननवरे, नगरसेवक सुरेश नेहतराव, नगरसेवक सुधीर धोत्रे, ऋषिकेश बडवे, विनायक संगीतराव, अनिल माने, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अर्जुन चव्हाण, संजय माने, युवराज कोताळकर, दत्ता तारापूरकर, तेजस अभंग, उमेश जाधव, संकेत श्रीखंडे, राजा गावटे,बबन शिंदे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: