निष्ठावान कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार – जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील

निष्ठावान कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार – जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील Party President will be strengthened by giving strength to loyal workers – District President Dr. Dhawalsinh Mohite Patil
    पंढरपूर /प्रतिनिधी :- सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मी लवकरच जिल्हा दौऱ्याचे आयोजन करून सर्वांच्या अडीअडचणी व त्यांच्या समस्या व त्यांचे प्रश्न विचारात घेऊन त्यांचे निरसन करून पक्षातील ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेसची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे आणि आजतागायत करीत आहेत अशांसह पक्षाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्यांना ताकद देऊन काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा बांधनी करून जिल्ह्यामध्ये मजबूत करणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा (आय)काँग्रेस कमिटीची नूतन जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काढले.

  पंढरपूर येथील श्री संत कैकाडी महाराज यांचे नातू व वैकुंठवासी गुरुवर्य हभप रामदास महाराज जाधव यांचे पुतणे किशोर तुळशीदास जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी धवलसिंह मोहिते-पाटील पंढरपूर मध्ये आले असता ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

डॉ धवलसिंह मोहिते पाटील पुढे म्हणाले काँग्रेस ही विचारधारेवर चालणारी संघटना असून त्यामुळे काँग्रेसची संघटना स्वातंत्र्य काळापासून टिकून असून मी लवकरच जिल्ह्यातील तालुका व शहरांमध्ये ब्लॉक ऑफाइस वॉर्डामध्ये बैठका घेऊन निष्ठावान कार्यकर्त्यांसह पक्षाचे कार्य जोमाने करणाऱ्या नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना संधी देऊ पक्षसंघटना मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी किशोर जाधव यांचा सत्कार नूतन जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

 या कार्यक्रमास निलेश संजय जाधव, दीपक वाल्मिक जाधव ,पंढरपूर (आय) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड राजेश भादुले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुहास भाळवणकर , माजी शहराध्यक्ष नागेश गंगेकर, माजी नगरसेवक किरण घाडगे, आनंदराव पाखरे, नागनाथ पांढरे ,संतोष ताटे, मधुकर फलटणकर ,सौ दुर्गाताई माने, डॉ सौ साधनाताई उगले ,आकाश जाधव,मिलिंद आढवळकर,अर्जुन जाधव ,अँड बादल यादव,जेम्स फिलिप्स,महावीर जाधव, संदीप अहिरे, प्रशांत कोळेकर, गणेश पारके ,प्रताप राजपूत ,बंटी गायकवाड, रवी गायकवाड, संदीप मांडवे,भाऊसाहेब शिंदे नाईक अमित अवघडे आदींसह पंढरपूर शहर (आय) काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: