गादेगाव व परिसरातील गावांमधील रस्ते व पाणी पुरवठय़ाबाबतच्या समस्या सोडवा – स्वाभिमानी युवा आघाडी प्रवक्ते रणजीत बागल

गादेगाव व परिसरातील गावांमधील रस्ते व पाणी पुरवठय़ाबाबतच्या समस्या सोडवा – स्वाभिमानीचे युवा आघाडीचे प्रवक्ते रणजीत बागल
 पंढरपूर - गादेगाव हे पंढरपूर तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असे गाव आहे . या गावास सुरू असलेला पाणीपुरवठा सध्या कमी दाबाने येतो तसेच गावची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली असुन त्यानुसार पाणी कमतरता जाणवत आहे त्यासाठीच एक नवी पाणीपुरवठा योजना सुरू करावी व गाव व वाड्यावस्त्या तसेच शेजारील गावांसाठी एक पाणीपुरवठा योजना सुरू करावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत गादेगाव व इतर गावांचे रस्ते दुरूस्ती व नवीन डांबरीकरण रस्ते करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे स्वाभिमानी युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

यावर सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेचे तात्काळ सर्वेक्षण करावे तसेच अंदाजपत्रक तयार करून लवकरात लवकर ही योजना सुरू करावी असे आदेश पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अभियंता व संबंधित अधिकारी यांना दिले. यावेळी मंत्रीमहोदयांनी येत्या काळात आपल्या विभागामार्फत रस्ते व पाणीपुरवठा योजना यांसाठी भरघोस निधी देवू अशी ग्वाही श्री बागल यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: