सहकार शिरोमणी कारखान्याच्यावतीने विजय कदम यांचा सत्कार

सहकार शिरोमणी कारखान्याच्यावतीने विजय कदम यांचा सत्कार
      पंढरपूर /प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ सोलापूर विभागाच्या संचालकपदी विजय जायाप्पा कदम, भंडीशेगांव यांची निवड झाल्याबद्दल सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते श्री विठ्ठलाची मुर्ती, शाल व फेटा देवुन सत्कार करण्यात आला.

     यावेळी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी विजय कदम यांच्या मार्गदर्शनामुळे पिरसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार असून, द्राक्ष बागायतदार यांच्या अडीअडचणी सोडविण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

 आपल्या तालुक्यामध्ये ऊस, डाळिंब पिकासह द्राक्ष हे महत्वाचे पिके असून, द्राक्ष पिकवाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्नामुळे त्यांना हे पद मिळाले असून, त्यांचे कार्य आपणा सर्वांना गौरवास्प्द असल्याचे कारखान्याचे संचालक सुधाकर कवडे यांनी सांगितले.

 यावेळी भंडीशेगावचे माजी उपसरपंच विश्वास सुरवसे, धनाजी कवडे-पाटील, माजी सरपंच संजय रणखांबे, चंद्रकांत कोळवले, विजय सुरवसे,विष्णु सुरवसे, कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे व सर्व संचालक, परिसरातील शेतकरी,खाते प्रमुख,विभाग प्रमुख, अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: