भाजप पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश

भाजप पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्यांसह मनसेत प्रवेश
  सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील भाजप किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि ब्राम्हण महासंघ शेतकरी आघाडी प्रदेश अध्यक्ष विवेक कुंभेजकर यांनी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मनसेचे राज्य नेते प्रदेश सरचिटणीस शँडो सहकारमंत्री दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथील मनसे कार्यालयात  मनसेमध्ये प्रवेश केला .

     यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, उपजिल्हा अध्यक्ष बाळासाहेब टोणपे ,तालुका अध्यक्ष सागर लोकरे , उपाध्यक्ष सागर बंदपट्टे , विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी , लातूरचे बापू कुलकर्णी , गणेश टिंगरे ,हरिदास देवकर , प्रशांत लोणकर ,सुरज राऊत, बरडे , सोमनाथ शिंदे ,सागर भिसे आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: