समाजकारणाला प्राधान्य देत प्रत्येक घटकासाठी झोकून देऊन काम करण्याची मनसेची पद्धत – मनसे नेते दिलीप धोत्रे

समाजकारणाला प्राधान्य देत प्रत्येक घटकासाठी झोकून देऊन काम करण्याची मनसेची पद्धत – मनसेचे नेते दिलीप धोत्रे MNS leader Dilip Dhotre

पंढरपूर / प्रतिनिधी- कोरोनाची महामारी,महिला बचत गटाच्या कर्जाबाबतच्या फायनान्स कंपनीचा विरोध असो इतर कोणतेही संकट असो महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक वेळी सर्वात अगोदर सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी धावली आहे . समाजकारणाला प्राधान्य देत प्रत्येक घटकासाठी झोकून देऊन काम करण्याची मनसेची पद्धत आहे . त्यामुळेच आज सर्वत्र तरूणांचा पक्षाला पाठींबा वाढत असल्याचे प्रतिपादन मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले . अजनसोड येथे ‘ मनसे ‘ शाखेचे उद्घाटन धोत्रे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते . या कार्यक्रमात विविध गावातील तरूणांनी मनसेत प्रवेश केला.

 त्यांना मार्गदर्शन करताना धोत्रे पुढे म्हणाले ग्रामीण भागातील अगदी वाडीवस्तीपयंत पक्ष,संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे . तळागाळातील प्रत्येक घटकाला मदत आणि न्याय मिळवून देत असताना पक्षाच्या कार्यकत्यांनाही ताकद दिली जात आहे . संकट काळात प्रमुख पक्षांनी जे केले नाही , ते काम मनसेने करून दाखविले आहे . त्यामुळे जनता मनसेच्या पाठीशी उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे . 

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे ,पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत शिनगारे पाटील, माढा विधानसभा अध्यक्ष धनाजी चव्हाण , पंढरपूर विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,तेजस गांजाळे, बालाजी वाघ , विभाग अध्यक्ष नागेश इंगोले , शिवाजी पाटील , बाळा पाटील , शाखाध्यक्ष रोहन डूबल , महादेव डुबल , समाधान शिरगिरे , गणेश चव्हाण , वैभव सिरसाट आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: