कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आचरणात आणावेत- महापौर श्रीकांचना यन्नम

रयत शिक्षण संकुलात कर्मवीर जयंतिंनिमित्त अभिवादन कार्यक्रम Karmaveer Bhaurao Patil’s thoughts should be put into practice- Mayor Shrikanchana Yannam
  सोलापूर ,22/09/2021 - कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले परंतु कोरोना महामारीच्या संकटामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून दुरावले आहेत अश्या स्थितीत कर्मवीरांचे शैक्षणिक विचार आत्मसात करून शिक्षकांनी समाजमंदिरात जाऊन अध्यापन करावे असे प्रतिपादन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी व्यक्त केले. 

सम्राट चौकातील रावजी सखाराम हायस्कूल च्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंतिंनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी महापालिका विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे होते.

यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे,विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ विकास कदम, जिल्हा क्रीडाधिकारी नितिन तारळकर,इतिहास अभ्यासक प्रा.नामदेव गरड, लक्ष्मी उद्योग समुहाच्या माधुरी पाटील, प्राचार्य डॉ दादासाहेब साळुंखे, संशोधक नितिन आणवेकर, कर सल्लागार धीरज जवळकर, केतनभाई शहा, रमेश शहा, ऋतुजा शहा, श्रीनिवास सरवदे, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, डॉ अरुण सोनकांबळे, रघुनाथ वग्गा उपस्थित होते.

   अमोल शिंदे म्हणाले की शंभर वर्षापूर्वी कर्मवीरांनी शैक्षणिक क्रांती केल्यामुळे बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण मिळाले.आजची  गुणवत्ताप्रधान पिढी त्यांच्यामुळेच समाज परिवर्तनाचे कार्य करत आहे. 

आनंद चंदनशिवे म्हणाले की वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांना अद्यापही उच्च शिक्षण मिळत नाही. सुविधाअभावी त्यांची कुचंबणा होत आहे म्हणून कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. 

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य हरीभाऊ ढवळे यांनी केले. सूत्रसंचलन वसंत नागणे यांनी केले. कार्यकर्माचे नियोजन निलिमा शिरसाठ, ज्योती चव्हाण यांनी केले. आभार संजय जोशी यांनी मानले. कार्यक्रमास महादेव बागल, मधुकर श्रीवास्तव,चंद्रकांत घुले,रामचंद्र हक्के,डॉ मल्लिनाथ अंजूनगीकर, महेश गाडेकर, अंजली पिराले,डॉ रावसाहेब ढवण, बाबुराव चोरमुले उपस्थित होते . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष वालवडकर, प्रतिभा भोसले, अमर देशमुख, अण्णा दिक्षित, अशपाक टंगसाळ, सतीश सावंत, सुवर्णमाला आधटराव, आनंद मुरूमकर, अंकुश राठोड, म्हाळप्पा ढोणे,महावीर आळंदकर यांनी प्रयत्न केले.  

उद्योगपती आण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचे स्मरण- कर्मवीरांचा वारसा अग्रहक्काने चालवणारे उद्योगपती अण्णासाहेब पाटील यांचे निधन झाले. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला. कार्यक्रम प्रसंगी एस. एस. सी परीक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त मोहित ओहाळ, गौरी जौंजट आणि माधुरी माने यांचा सत्कार महापौर यन्नम यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: