विधान भवनात महात्मा फुले द्विशताब्दी वर्षाची सुरुवात; डॉ.नीलम गोऱ्हे यांचा समतेचा प्रभावी संदेश

विधान भवनात महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभनिमित्त अभिवादन

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समतेचा संदेश

विधान भवनात महात्मा फुले द्विशताब्दी वर्षाची सुरुवात; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा समतेचा प्रभावी संदेश

मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२६ : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाच्या प्रारंभी आज विधान भवन येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “ज्या महिलांना शिक्षणाचा लाभ झाला, त्यांच्यापैकी मी स्वतः एक आहे. आम्ही सर्वजणी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मानसकन्या आहोत. आज माझ्या हस्ते येथे अभिवादन होत आहे, हे सर्व त्यांच्या आणि सर्व समाजसुधारकांच्या कार्याचे श्रेय आहे. मी त्यांना मनापासून नतमस्तक होऊन अभिवादन करते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. कार्यक्रमास विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-४ शिवदर्शन साठ्ये, उपसचिव श्री. विजय कोमटवार, उपसभापतींचे खासगी सचिव श्री. अविनाश रणखांब, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक व जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या मनोगतात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत शिक्षण, समता आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश अधोरेखित केला. त्यांनी सांगितले की, फुले दांपत्याच्या प्रयत्नांमुळे समाजात परिवर्तनाची चळवळ उभी राहिली.

त्या पुढे म्हणाल्या की,द्विशताब्दी वर्षा निमित्त समाजात समता, बंधुभाव आणि सर्वसमावेशक विकासासाठी नव्याने संकल्प करण्याची गरज आहे. शिक्षण, विकास, तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या माध्यमातून प्रगत समाज घडविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Back To Top