प्रवासी बसच्या प्रवाश्यांच्या भागात आगीची सूचना देणारा अलार्म व आग प्रतिबंधक व्यवस्था बसवण्यासाठीच्या अधिसूचनेचा मसूदा

प्रवासी बसच्या प्रवाश्यांच्या भागात आगीची सूचना देणारा अलार्म व आग प्रतिबंधक व्यवस्था बसवण्यासाठीच्या अधिसूचनेचा मसूदा Draft notification for installation of fire alarm and fire prevention system in passenger area of passenger bus

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2021,PIB Mumbai

  • प्रवासी बसच्या प्रवाश्यांच्या भागात आगीची सूचना देणारा अलार्म व आग प्रतिबंधक व्यवस्था बसवण्यात यावे यासाठी ऑटोमेटिव इंडस्ट्री स्टॅन्डर्ड -135 मध्ये सुधारणा करणाऱ्या अधिसूचनेचा मसूदा 21 सप्टेंबर 2021 रोजी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आला. रुढ पद्धतीनुसार आग शोधक,सूचक (अलार्म) व आग विझवणारी व्यवस्था या संबधीच्या अधिसूचना फक्त इंजिन असलेल्या भागात लागलेल्या आगीपुरत्याच मर्यादित आहेत. टीयर-III बसेस म्हणजे प्रवाशांना बसण्यासाठी आसनव्यवस्था असलेल्या लांब अंतरावर जाणाऱ्या प्रवासी बस आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस यांच्यासाठीच मसूदा अधिसूचना मर्यादित आहेत. आगीच्या घटनांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की बहुतांशी प्रवाशांना होणारी इजा ही त्या बसच्या प्रवासी भागातील उष्णता व धूर यामुळे होते.आग लागल्यावर प्रवासी भागातील उष्णता आणि धूर यांना किमान 3 मिनिटे तरी प्रतिबंध करता आला तर प्रवाश्यांना सुटका करून घ्यायला अतिरिक्त वेळ मिळून होणारी हानी टाळता येते. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने DRDO सह इतर अनेक संबधितांशी सल्लामसलत करून या समस्येवरील तांत्रिक उपाय काढला. आगीची सूचना देणाऱ्या अलार्म सोबत पाण्याच्या वाफेची आग प्रतिबंधक यंत्रणा विकसित केली.या यंत्रणेचा सिम्युलेशन तंत्राने केलेला अभ्यास हे दाखवून देतो की 30 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 50 डिग्री सेंटीग्रेडच्या मर्यादेत प्रवासी भागातील तापमानावर नियंत्रण राखता येते.

या अधिसूचनेवर संबधितांकडून 30 दिवसात सूचना मागवण्यात येत आहेत.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: