साई प्रतिष्ठान,योग विद्या धाम पंढरपूर व सावरकर प्रेमी मंडळ यांच्यावतीने अभियंता दिन

पंढरपूरातील गुणवंत अभियंत्यांना पुरस्काराने सन्मानित Engineer’s Day celebrated on behalf of Sai Pratishthan, Yoga Vidya Dham Pandharpur and Savarkar Premi Mandal
पंढरपूरः साई प्रतिष्ठान, योग विद्या धाम पंढरपूर व सावरकर प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर मधील गुणवंत अभियंत्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम यु- ट्यूब व फेसबुक लाईव्ह आयोजित करण्यात आला होता.

   नंदकुमार डिंगरे,भारत ढोबळे ,मिलिंद वाघ, अशोक ननवरे,उदय उत्पात,तानाजी जाधव, अमोल अभंगराव या अभियंत्यासह संशोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.यशवंतराव यादव व डॉ. अतुल सागडे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

 साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरनाथ परदेशी,योग विद्या धामचे अध्यक्ष अशोक ननवरे व सावरकर प्रेमी मंडळाचे मोहन मंगळवेढेकर , नगरसेवक विवेक परदेशी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

 अभियंत्यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान असल्याचे साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरनाथ परदेशी यांनी सांगितले . 

तांत्रिक कार्याबरोबर अभियंते क्रिडाक्षेत्र, संगीत क्षेत्र, योग व आरोग्य, सामाजिक संघटना व संशोधनात उल्लेखनीय कार्य करीत आहेत असे अशोक ननवरे म्हणाले.

 प्रसिद्ध बासरीवादक अभियंता नंदकुमार डिंगरे यांच्या बासरी वादनाने कार्यक्रमात रंगत आली . सौ हेमलता यारगट्टीकर, सौ कोमल कुरणावळ व सवीता पिंपळनेकर यांनी योग गीत सादर केले.

   याप्रसंगी सर्व पुरस्कारप्राप्त अभियंत्यांनी आपले मनोगते व्यक्त केली. नगरसेवक विवेक परदेशी यांनी सांगितले की, सध्या टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड बदल होत असून या बदलाचे सर्व श्रेय अभियंते व संशोधकांना जाते.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अमरजा कुलकर्णी यांनी केले.अश्विनी आराध्ये यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख सविता पिंपळनेरकर व शितल गुंडेवार यांनी केली . आभार नगरसेवक विवेक परदेशी यांनी मानले.

   किशोर ननवरे, सौ संगीता ननवरे, श्रीनाथ खंदारे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्ह व युट्युब लाईव्ह करण्याचे काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: