एफआरपी पूर्ण केल्याशिवाय परवाना देणार नाही – साखर आयुक्त शेखर गायकवाड
एफआरपी पूर्ण केल्याशिवाय परवाना देणार नाही – साखर आयुक्त शेखर गायकवाड Will not issue license without completing FRP – Sugar Commissioner Shekhar Gaikwad
पुणे,२४/०९/२०२१ – आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ सोलापूर जिल्ह्यातील श्री विठ्ठल सहकारी, श्री भीमा सहकारी , सहकार शिरोमणी, संत दामाजी यांच्यासह इतर कारखान्यांच्या एफ आर पी, कामगारांच्या पगारी ,ऊस वाहतूक बिले यांच्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन साखर आयुक्त शेखर गायकवाड पुणे यांची भेट घेतली.
ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले (FRP) संपूर्णपणे दिले आहेत अशाच साखर कारखान्यांना गाळप परवाना द्यावा,काही कारखाने करार करून चार टप्प्यात एफआरपी देणार असल्याचे सांगत आहेत तर काही कारखानदार एफआरपी दिल्याची खोटी माहिती देत आहेत अशा सर्व कारखान्यांची सखोल चौकशी करून जोपर्यंत त्यांची 100% एफआरपी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना गाळप परवाना देऊ नये. जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी सर्वसाधारण सभेमधून काही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचे सभासदत्व कायम राहावे,काही कारखानदार काटा मारी, रिकव्हरी कमी दाखवणे असे प्रकार करत आहेत त्याच्यामध्ये लक्ष घालावे.
कारखान्याच्या सर्वसाधारण सभा ऑनलाईनच्या ऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाईन घ्यावेत या मागण्या घेऊन स्वाभिमानीचे सोलापूर जिल्ह्यातील शिष्टमंडळ यामध्ये युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक शहाजहान शेख, माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर, तालुका युवाध्यक्ष अमर इंगळे करमाळा तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे ,अतुल पिसे आदी उपस्थित होते .
यावेळेस साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून जे कारखाने १५ ऑक्टोबर च्या अगोदर 100% एफ आर पी देतील त्यांनाच गाळप परवाना देऊ तसेच इतर विषयांसाठी लवकरच पंढरपूर येथे साखर आयुक्त व स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांची बैठक घेण्याचे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहे.