अखिल भारतीय मराठा महासंघ सांगोला तालुका व शहर कार्यकारीणी जाहिर

अखिल भारतीय मराठा महासंघ सांगोला तालुका व शहर कार्यकारीणी जाहिर
  पंढरपूर / नागेश आदापूरे - अखिल भारतीय मराठा महासंघाच्या Akhil bhartiy Maratha mahasangh सांगोला तालुका व शहराच्या पदाधिकारी निवडी राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र पाटील ,राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन झाल्या.

    यावेळी रोहित शिंदे यांची सांगोला तालुकाध्यक्षपदी व अमोल सावंत यांची सांगोला शहराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.यांच्यासह गौरीहार सरवळे,सागर बाबर, संतोष जगदाळे, कृष्णा घाडगे, सत्यवान गायकवाड,केशव सरवळे,दीपक घाडगे,रमेश बाबर, सागर शिंदे, स्वप्निल पवार, धनाजी भातुकडे, संकेत सरवळे, योगेश खटकाळे, योगेश खराडे यांच्या निवडी करण्यात आल्या.

    यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ,पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव,तालुका कार्याध्यक्ष शिवाजी मोरे,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव,विभागप्रमुख पांडुरंग शिंदे,रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: