स्नॅचिंग करणा-याकडून विविध कंपन्याचे महागडे मोबाईल व बुलेट मोटारसायकल असा मुददेमाल हस्तगत

स्नॅचिंग करणा-याकडून विविध कंपन्याचे महागडे मोबाईल व बुलेट मोटारसायकल असा ३,८२,000 / – रू.किंमतीचा मुददेमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी Performance of Local Crime Branch Solapur Grameen

सोलापूर – सोलापूर जिल्हयात मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने , सोलापूर जिल्हयात मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्हयामध्ये वाढ झाली होती . त्या अनुषंगाने माहिती घेवून वरिष्ठांनी सदरच्या मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणा-या टोळीस अटक करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोसई शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्हे कोणी केले असतील , याबाबत माहिती काढली असता पथकास गोपनिय बातमीदारामार्फत सदरचे गुन्हे टाकळी येथील एका इसमाने त्याचे साथीदारासह केले असल्याची माहिती प्राप्त झाली . सदरच्या अनुषंगाने खात्री केली असता बातमी प्रमाणे एक इसम चोरीला गेलेले मोबाईल व बुलेट मोटारसायकल घेवून टाकळी ता .दक्षिण सोलापूर येथून सोलापूर शहर येथे मोबाईल विक्री करीता जात असल्याची खात्री झाली.त्या अनुषंगाने पथकाने वडकबाळ , ता.दक्षिण सोलापूर येथे सापळा लावून बातमीतील वर्णनाच्या इसमास बुलेट मोटारसायकल व त्याचेकडील मोबाईलसह ताब्यात घेतले . सदर इसमास त्याचेकडे असलेले मोबाईल व बुलेट मोटारसायकल याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरूवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली , परंतु त्यास अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता , त्याने त्याचे इतर साथीदारासह सदरचे मोबाईल चोरी केल्याचे सांगितले . त्याचे ताब्यातील बुलेट मोटारसायकल सुध्दा त्याने स्वतः सोलापूर शहरातून चोरी केल्याचे सांगितले आहे . सदर इसमाच्या ताब्यातील विविध कंपन्याचे २२ महागडे मोबाईल,बुलेट मोटारसायकल असा एकुण ३,८२,000 / – रू . किंमतीचा मुददेमाल पुढील तपासकामी ताब्यात घेतला आहे . सदर इसमाच्या ताब्यात मिळालेले मोबाईल व बुलेट मोटारसायकल याबाबत चौकशी करून खात्री केली असता अटक आरोपीकडुन एकुण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत . तसेच गुन्हयातील अटक आरोपी हा पिंपरी पोलीस ठाणे येथील गुन्हयात पाहिजे आरोपी आहे . अटक आरोपीचे साथीदार यांचेवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत .

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते , अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली शैलेश खेडकर पोलीस उपनिरीक्षक , सफौ श्रीकांत गायकवाड,पोलीस अंमलदार सलीम बागवान ,दिलीप राऊत ,हरिदास पांढरे ,रवि माने , सचिन गायकवाड , चापोना / केशव पवार यांनी बजावली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: