पंचनामा – हल्ला बोल …गावठी चिमटा
पंचनामा – हल्ला बोल …
गृहमंत्री कोटीने हप्ते वसूल करून द्या
असं पोलीस आयुक्तच जाहीर
आरोप करत आहेत
तर पालकमंत्री आता
धरणातील पाणी पळवतात
असा जाहीर आरोप धरणग्रस्तच करत आहेत
जसं मिळेल तसं घावल तसं जो तो
हवं ते लुटतो आहे
सामान्य मात्र ऑक्सिजन अभावी
रुग्णालयात मरतो आहे
सत्ताधारी अन अधिकारी मिळेल तसं
मतून खिसे भरतो आहे “!!
गावठी चिमटा :

राज्यपाल यांना सारखे सारखे
भेटून भेटून होणारं काय ?
वरच सांगतील तसंच होणारं
दुसरं कन्चच होणार नाय
लिंबाच्या झाडाला
आंबा कंदीच लागणार नाय “!!
आनंद कोठडीया,जेऊर,ता.करमाळा
९४०४६९२२००