डॉक्टराप्रमाणे औषध विक्रेता यांनी हि कोरोना काळात केलेले कार्य गौरवास्पद – डॉ.करंदीकर
कुर्डूवाडी / प्रतिनिधी - डॉक्टरांप्रमाणे औषध विक्रेता यांनी हि कोरोना काळात केलेले कार्य गौरवास्पद आहे. सोलापूर जिल्हयातील औषध विक्रेत्यांनी कोरोना काळात लाखो रुपयाची औषधे मोफत वाटली आहेत असे प्रतिपादन डॉ.जयंत करंदीकर यांनी येथील जीवनरक्षा समितीने फार्मासीस्ट डे निम्मिताने आयोजित केलेल्या औषध विक्रेते संघाचा सत्कार प्रसंगी केले.
यावेळी डॉ.संतोष कुलकर्णी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गर्भ लिंगनिदान प्रतिबंध कमिटी आय.एम. ए.महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, मोतीमाळ, मास्क,कोरोना सन्मानपत्र देवून औषध विक्रेते पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशा नुसार नियम पाळून हा उपक्रम घेतला गेला.
याप्रसंगी जीवनरक्षा समितीचे अध्यक्ष राहुल धोका, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किरण गोडसे, जयश्री करंजकर, मेडीकल असोशीएशनचे अध्यक्ष परेश कोठारी, वसंतराव मुंडवे, बाळासाहेब शेंडगे सिद्धेश्वर शेटे, धनंजय वाघमोडे,मिलिंद कराडे, केतन मेहता, अनिल घुगे, प्रमोद सुर्वे, दीपक दोशी, शरद लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुधीर गाडेकर, वीरेंद्र कांबळे, राजू हलकुडे , चंपालाल सोनिमेंडे, शामराव पाटील यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.