शिवसेना शहर संघटक राजेंद्र शिंदे,सौ.अश्विनी रा. शिंदे यांनी राबवलेल्या अभियानाला उत्तम प्रतिसाद
शिवसेना शहर संघटक राजेंद्र शिंदे,सौ.अश्विनी रा. शिंदे यांनी राबवलेल्या अभियानाला उत्तम प्रतिसाद

पुणे / डॉ अंकिता शहा - शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thakare यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क Shivsampark abhiyan अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत माझा प्रभाग कोरोनामुक्त प्रभाग या उपक्रमाअंतर्गत ZS केअर इनीसेंटिव्ह व जिविका हेल्थ केअर यांच्या सहकार्याने कोविड लसीकरणाचा ८ वा टप्पा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यामध्ये बुधवार पेठेतील रेडलाईट भागातील देहविक्री करणाऱ्या भगिनी व घरेलू कामगार महिला, तृतीय पंथी,अंध,अपंग बांधव यांचे लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे,कसबा युवासेना उपाध्यक्ष युवराज पारीख,अश्रफ शेख यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमाचे संयोजन शहर संघटक राजेंद्र शिंदे आणि सौ.अश्विनी रा.शिंदे यांनी केले . पृथ्वीराज येळवंडे, अविनाश मरळ,संतोष सिन्नरकर, अनमोल परदेशी,मयूर चाचुरडे,संकेत चाचुरडे, दीपक त्रिवेदी,रोहित हिटमुद्दे,कांतीलाल परदेशी, अमर गायकवाड, हृषीकेश रा.शिंदे,संजय शिंदे, आकाश शिंदे यांनी हा लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
