नागपंचमी महोत्सव विजेत्यांना स्वराजची मानाची साडी, सोन्याची नथ,चांदीचा छल्ला आणि काही

  • नागपंचमी महोत्सवात विजेत्यांना स्वराजची मानाची साडी,सोन्याची नथ,चांदीचा छल्ला
  • भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व स्वराज फाऊंडेशन,माऊली फाउंडेशन आयोजीत नागपंचमी महोत्सव

फलटण -भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व स्वराज फाऊंडेशन,माऊली फाउंडेशन आयोजीत नागपंचमी महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांनी भारतीय संस्कृतीचे पारंपारिक खेळ फुगडी,झोका,उखाणे यांचा मनमुराद आनंद घेतला.यावेळी स्वराजची मानाची साडी सोन्याची नथ यावेळी स्वराज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अ‍ॅड.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी महिलांमध्ये सहभागी होत या कार्यक्रमाचा आनंदद्वगुणीत केला.

नागापंचमी हा आम्हा महिलांचा सण आहे. स्वराज फाउंडेशंनच्या माध्यमातुन महिलांना एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून महिलांच्या कलांगुणांना वाव दिल्याचे आपल्याला समाधान मिळत असल्याचे यावेळी अ‍ॅड.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सांगितले.यापुढे ही स्वराज फाउंडेशन महिलां साठी कार्यरत राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी भाजप अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा , उषा राऊत, मनिषा नायगावकर,पल्लवी भाजने,रसिका भोजने, माधुरी कोरडे,रूपाली सांळुखे,शुभांगी रासकर, संगीता भोसले, संगीता देशमाने, लक्ष्मी काळे, रेखा यादव,आसमा शेख,पद्मा चांडक, हिना शेख,तसलिमा आतार, शितल मोहीते, पुनम मोहीते, अनिता खटावकर, लता यादव, पुजा चिंचकर,सुनिता कर्वे आदींची उपस्थिती होती.

अलका जगताप,मंगल पवार,दिपाली भोजणे, अश्‍विनी देवकर,पुजा पवार,वृषाली गांधी यांनी उखाणा स्पर्धेत भाग घेतला. रेश्मा झांझुर्णे दिपाली भोजने, प्रिती भोजने ,रेखा गांधी या संगीत खुर्चीत विजेत्या ठरल्या तर विद्या चांगण अश्विनी शिंदे, शंकुतला गणदास या फुगा गेम मध्ये विजेत्या ठरल्या. यावेळी विजेत्यांना स्वराजची मानाची साडी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला , न्यु सिटी बझारची 1000 हजार रूपयांची कुपन, सहारा लाईफ स्टाईल प्रत्येकी 1000/- कुपन,लेमन सेट स्टीमर अशी बक्षीसे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: