कार लोन स्वस्तात हवंय, मग या बँकांच्या ऑफर्सचा घेऊ शकता लाभ


आपली स्वतःची कार असणं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करत कार विकत घेतो. गेल्या तीन महिन्यात आपल्या देशात कारच्या विक्रित मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लोक मोठ्या प्रमाणात कार खरेदी करत आहेत. सध्या अनेक बँका कार कर्जावर आकर्षक व्याजदर देत आहेत. काही बँका कार कर्जावर (झीरो प्रोसेसिंग फी) शून्य प्रक्रिया शुल्क देखील आकारत आहेत. कार ही एक अवमूल्यन करण्यायोग्य मालमत्ता असते, म्हणजेच एखादी नवीन कार खरेदी केल्यावर मग तिची किंमत कमी होऊ लागते. म्हणूनच कारवरील कर्जासाठी दीर्घ कालावधीची निवड करू नये. तर पाहूया कोणत्या बँका आहेत ज्यांचा कार कर्जावरील ऑफर्ससाठी आपण लाभ घेऊ शकतो.

पंजाब नॅशनल बँक
समजा जर कर्जाची रक्कम १ लाख रुपये आहे आणि कालावधी पाच वर्षांचा आहे. तर त्याप्रमाणे पंजाब नॅशनल बँक (PNB) कार कर्जावर ७.६५ टक्के ते ९.०५ टक्के व्याज दर देत आहे. इथे इएमआय २०११ रुपयांपासून २०७८ रुपयांदरम्यान असेल. पीएनबी मान्सून बोनांझा ऑफर २०२२ अंतर्गत ३० डिसेंबर २०२२ अंतर्गत प्रक्रिया शुल्क माफ केले आहे.

‘वाचा – Multibagger Stock : ‘या’ स्टॉक्सने एका वर्षात चारपट परतावा दिला, तुमच्याकडे आहे का

भारतीय स्टेट बँक
समजा जर कर्जाची रक्कम १ लाख रुपये आहे आणि कालावधी पाच वर्षांचा आहे. तर त्याप्रमाणे भारतीय स्टेट बँक (SBI) कार कर्जावर ७.५५ टक्के ते ८.४५ टक्के व्याजदर देत आहे. इथे इएमआय २००६ रुपयांपासून २०४९ रुपयांदरम्यान असेल. सध्या ही बँक देखील शून्य प्रक्रिया शुल्क आकारत हे.

इंडियन बँक
समजा जर कर्जाची रक्कम १ लाख रुपये आहे आणि कालावधी पाच वर्षांचा आहे. तर त्याप्रमाणे भारतीय इंडियन बँक (IB) कार कर्जावर ७.८० टक्के ते ८.० टक्के व्याजदर देत आहे. इथे इएमआय २०१८ रुपयांपासून २०२८ रुपयांदरम्यान असेल. येथे प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या ०.५० टक्के (जास्तीत जास्त १०,००० रुपये) आहे.

वाचा – भारतीय सुधरणार नाही… शेवटच्या तारखेला ITR भरण्यास लाखो करदाते तुटून पडले

सेंट्रल बँक ऑफ इंडिया
समजा जर कर्जाची रक्कम १ लाख रुपये आहे आणि कालावधी पाच वर्षांचा आहे. तर त्याप्रमाणे सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CENTRAL BANK OF INDIA) कार कर्जावर ७.४० टक्के ते ८.५५ टक्के व्याजदर देत आहे. इथे इएमआय १९९९ रुपयांपासून ते २०५४ रुपयांदरम्यान असेल. वेलकम मान्सून रिटेल मोहिमेअंतर्गत १३ ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रक्रिया शुल्कसाठी सूट देण्यात आली आहे.

पंजाब अँड सिंध बँक
समजा जर कर्जाची रक्कम १ लाख रुपये आहे आणि कालावधी पाच वर्षांचा आहे. तर त्याप्रमाणे पंजाब अँड सिंध बँक (P&S bank) कार कर्जावर ७.७० टक्के ते ८.८० टक्के व्याजदर आकारत आहे. इथे इएमआय २०१३ ते २०६६ रुपयांदरम्यान असेल. ही बँक कर्जाच्या रकमेच्या ०.२५ % (किमान रु. १००० आणि कमाल रु. १५०००) प्रक्रिया शुल्क आकारत आहे.

बँक ऑफ इंडिया
समजा जर कर्जाची रक्कम १ लाख रुपये आहे आणि कालावधी पाच वर्षांचा आहे. तर त्याप्रमाणे बँक ऑफ इंडिया (BOI) कर्जावर ७.७५ टक्के ते ९.४५ टक्के व्याजदर देत आहे. इथे इएमआय २०१६ ते २०९८ रुपयांदरम्यान असेल.

बँक ऑफ बडोदा
समजा जर कर्जाची रक्कम १ लाख रुपये आहे आणि कालावधी पाच वर्षांचा आहे. तर त्याप्रमाणे बँक ऑफ बडोदा (BOB) कर्जावर ७.७० ते १०.९५ टक्के व्याजदर देत आहे. इथे इएमआय २०१३ ते २१७२ रुपयांदरम्यान असेल. ही बँक कार कर्जावर १५०० रुपये अधिक जिएसटी पिटके प्रक्रिया शुल्क आकारत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र
समजा जर कर्जाची रक्कम १ लाख रुपये आहे आणि कालावधी पाच वर्षांचा आहे. तर त्याप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) कर्जावर ७.७० ते १०.२० टक्के व्याजदर देत आहे. इथे इएमआय २०१३ ते २१३५ रुपयांदरम्यान असेल. या बँकच्या वेबसाईटवर प्रक्रिया शुल्काबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: