मोठी बातमी! संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या, पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स
ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात भाष्य केले होते. संजय राऊत हे यापूर्वी झालेल्या चौकशीवेळी सर्व माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकली तेव्हा काही कागदपत्रे सापडली होती. त्यावरून असे दिसते की, संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. त्यांच्या खात्यातून मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत.
हेही वाचा –ED म्हणाली – आम्ही त्यांना AC खोलीत ठेवलं, राऊत म्हणाले – ‘मी फक्त पंखाच पाहिला’
पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये पाठवण्यात आले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. त्यामुळे आता वर्षा राऊत मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा –संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ; कोर्टाने सुनावली आणखी चार दिवसांची ईडी कोठडी
संजय राऊतांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ
ईडीने सोमवारी संजय राऊतांना मनीलाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांच्यासमोर हजर केले आणि त्यांची आठ दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावली. त्यामुळे आता संजय राऊतांना आणखी चार दिवस न्यायालयीन कोठडीत घालवावे लागणार आहेत.
काय आहे ईडीचा दावा?
‘पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआय घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये हे संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले असून ही रक्कम आणखीही असू शकते’, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याआधी कोर्टात केला होता.
हेही वाचा –Sanjay Raut: कोर्टात जाताना संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यात वाद, वाचा नेमकं काय घडलं?
ईडीचे १० अधिकारी, ९ तास चौकशी, संजय राऊतांना ताब्यात घेतलं ते प्रकरण काय आहे?