संजय राऊतांची ती ‘डायरी’ अडचणी वाढवणार, कुणाला पैसे दिले याचा कोडवर्डमध्ये उल्लेख, ईडीचा दावा


मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आज (४ ऑगस्ट) मनीलाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयाने संजय राऊतांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंतची वाढ केली आहे. तर, ईडीने राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ प्रकरणी समन्स पाठवलं आहे. त्यानंतर आता ईडीला राऊतांच्या घरातून जप्त केलेल्या एका डायरीमध्ये काही कोडवर्ड्सच्या नोंदी आढळल्या आहेत. हे कोडवर्ड म्हणजे ज्या लोकांना पैसे दिले त्यांची नावं असल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यामुळे आता राऊतांच्या भोवती असलेला ईडीचा फास आणखी घट्ट होण्याची शक्यता आहे.

ईडीचा दावा काय?

ईडीने संजय राऊतांच्या घरातून १ कोटी १७ लाख रुपयांच्या हिशोबाचे कागदपत्र जप्त केले होते. यामध्ये एक डायरीही ईडीने जप्त केली आहे. या जप्त केलेल्या डायरीमध्ये कोडवर्डमध्ये काही नोंदी असल्याचं नमुद आहे. कुणाला पैसे दिले याचा कोडवर्डमध्ये उल्लेख केल्याचा ईडीचा दावा आहे.

हेही वाचा –मोठी बातमी! संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या, पत्नी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स

राऊतांच्या खोलीतून आढळली ही ‘डायरी’

संजय राऊतांविरोधात त्यांच्याच घरातून पुरावे सापडल्याचा ईडीचा दावा आहे. ईडीला यासंबंधित एक डायरी सापडली आहे. संजय राऊतांच्या खोलीतून ही डायरी ईडीने जप्त केली आहे. यामध्ये कोडवर्डमध्ये काही लोकांची नावं होती. १ कोटी १७ लाख रुपये रोकड या लोकांना दिल्याची नोंद त्यात आहे. हे पैसे का दिले गेले, हे लोक कोण आहेत. या नावांचा या कोड्सचा अर्थ काय? याबाबत ईडीने विचारणा केली असता तेव्हा संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडून कुठलंही उत्तर आलं नाही.

हेही वाचा –ED म्हणाली – आम्ही त्यांना AC खोलीत ठेवलं, राऊत म्हणाले – ‘मी फक्त पंखाच पाहिला’

डायरी अत्यंत महत्त्वाची

आजच्या रिमांड रिपोर्टमध्येही ईडीने १ कोटी १७ लाख रुपये मिळाल्याचा उल्लेख केला आहे. ही डायरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ईडीला असा संशय आहे की जी रोकड पत्राचाळ घोटाळ्यातून मिळाले होते, ते पैसे इथे देण्यासाठी वापरले गेले. हे पैसे संजय राऊत यांच्या जवळच्या लोकांच्या नावावर दिले गेले. त्यांची नावं कोणाला कळू नये म्हणून उल्लेख कोडमध्ये करण्यात आलेला आहे, असा दावा ईडीने केला आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता ईडी करत आहे. तर ३ कोटीच्या रकमेचा उल्लेख आजच्या रिमांड रिपोर्टमध्ये ईडीने केलेला नव्हता. सूत्रांच्या माहितीनुसार, ३ कोटी रोकडही त्यांनी वापरली आहे. त्याबाबतही चौकशी केली जात आहे.

हेही वाचा –संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ; कोर्टाने सुनावली आणखी चार दिवसांची ईडी कोठडी

काय आहे ईडीचा दावा?

‘पत्राचाळ पुनर्विकास व एफएसआय घोटाळा प्रकरणात प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे फ्रंट मॅन म्हणून कार्यरत होते. संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यानेच प्रवीण यांनी म्हाडाकडून आवश्यक त्या मंजुरी मिळवल्या. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात प्रवीण यांनी अवैधरीत्या मिळवलेल्या ११२ कोटी रुपयांपैकी १ कोटी ६ लाख रुपये हे संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांकडे थेट गेले असल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले असून ही रक्कम आणखीही असू शकते’, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याआधी कोर्टात केला होता.

पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय?

पत्राचाळ प्रकरणात बिल्डरने १०३४ कोटींची फसवणूक केल्याची तक्रार दाखल होती. २००८ मध्ये पत्राचा पुनर्विकास प्रकल्प सुरू झाला. मुंबईतील गोरेगाव येथे ६७२ घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांचा म्हाडा आणि बिल्डर सोबत करार झाला. म्हाडा, गुरु आशिष बांधकाम कंपनी आणि रहिवासी यामध्ये हा करार झाला होता. एकूण १३ एकर जागेपैकी साडेचार एकर वर मूळ रहिवाशांना घर आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री बांधकाम करेल असं ठरलं होतं. मात्र गुरु आशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर ही जागा खाजगी बिल्डरला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणात ईडी कडून यापूर्वी गुरु आशिष कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत अडचणीत, मुंबईतील घरी ED चे अधिकारी दाखलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: