अदानी देणार सर्वांना धक्का; आता जगातील टॉप-३ शी भिडणार


मुंबई : भारताचे प्रसिद्ध उद्योपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी फार काळापासून अरबपती म्हणून असलेल्या काही अब्जाधीशांना देखील मागे टाकले आहे. आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ति म्हणून समोर आलेल्या अदानी यांचा अब्जाधीशांच्या यादीत कायमच दबदबा आहे.

काही दिवसांपूर्वी बिल गेट्स यांनी २० अब्ज डॉलर्सची देणगी जाहीर केल्यानंतर अब्जाधीशांच्या यादीत अदानी एक स्थान पुढे सरकले होते. ज्या वेगाने आता त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होताना दिसत आहे, त्यावरून अदानी हे लवकरच अब्जाधीशांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर येतील असे दिसत आहे.

९० दिवसानंतर तुम्हाला मिळणार आनंदाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या किमती ५ रुपयांनी घसरणार, जाणून घ्या कारण

फोर्ब्स अब्जाधीश निर्देशांकांनुसार गौतम अदानी फार वेगाने पुढे सरकत आहेत आणि याच वेगाने जर ते पुढे जात राहिले तर तिसर्‍या क्रमांकावर असलेले अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांच्या देखील ते पुढे निघून जातील. या दोन्ही अब्जाधीशांमधील संपत्तीचे अंतर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १.२ बिलियनने वाढून १३१.१ बिलियन इतकी झाली आहे आणि ते जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ति बनले आहेत.

बेजोसच्या संपत्तीत घट
एकेकाळी जगातील सर्वाधिक श्रीमंत म्हणून ओळखले जाणारे जेफ बेजोस यांच्या संपत्तीमध्ये २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. याआधी एलन मस्क यांनी त्यांच्याकडून सर्वाधिक श्रीमंत असल्याचा किताब हिरावून घेतला आणि त्यामुळे जेफ बेजोस दुसर्‍या क्रमांकावर आले होते. तर फ्रान्सचे अरबपती बर्नार्ड अर्नाल्ट सातत्याने त्यांच्या पुढे दुसर्‍या क्रमांकावर राहिले आहेत. जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती १६५.१ बिलियन असून सध्या ते तिसर्‍या क्रमांकावर आहेत. २०२२ मध्ये जगभरात सर्वाधिक कमाई करणारे गौतम अदानी ठरले आहेत. अदानी आणि जेफ बेजोस यांच्या एकूण संपत्तीमध्ये आता फक्त ३४ बिलियनच फरक उरला आहे.

तुमच्या मालकीची एकापेक्षा जास्त घरं आहेत? मग हे वाचाच, तुम्हीही येऊ शकता IT च्या रडारवर

गुरुवारी टॉप – १० अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर झालेले दिसून आले. मायक्रोसोफ्टचे बिल गेट्स आता पाचव्या क्रमांकावरील अब्जाधीश राहिले नसून त्यांची सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती १०७ बिलियन इतकी राहिली आहे. तर लैरी एलिसन यांची एकूण संपत्ती १०७.६ बिलियन असून ते आता पाचव्या क्रमांकावर आले आहेत.

टॉप-१० श्रीमंत कोण?
टॉप १० च्या यादीमध्ये दोन नावे अशी आहेत ज्यांची संपत्ती १०० बिलियनपेक्षा कमी आहे, त्यांच्यामध्ये रिलायंस समूहाचे मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. अंबानींची एकूण संपत्ती १८४ मिलियन डॉलरवरुण ९४.७ बिलियन झाली आहे. या आकडेवारीनुसार ते आता १० व्या क्रमांकावर आहेत. तर ९ व्या क्रमांकावर सर्गेई ब्रिन असून यांची संपत्ती ९७.६ बिलियन इतकी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: