स्वत:चे घर ६ वर्षाच्या मुलीसाठी बनले गॅस चेंबर; आई-वडील देखील रुग्णालयात, पाहा काय झाले


बेंगळुरू: घरात कीटकाचा त्रास होऊ नये म्हणून अनेकदा कीटकनाशकांची फवारणी केली जाते. पण कीटकांचा त्रासपासून वाचण्यासाठी केलेल्या या फवारणीमुळे एका सहा वर्षाच्या मुलीला जीव गमवावा लागला. कर्नाटकमधील बेंगळुरू शहरात घटलेल्या या घटनेमुळे संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेंगळुरू येथे राहणारे विनोद कुमार एका कॉर्पोरेट कंपनीत काम करतात. हे कुटुंबीय वसंत नगर येथील मरम्मा मंदिर मार्गावरील एका घरात भाड्याने राहत होते. संपूर्ण कुटुंब २८ जुलै रोजी केरळला गेले होते आणि ते सोमवारी सकाळी परतले. कुमार, त्यांची पत्नी निशा आणि मुलगी आहाना केरळला फिरण्यासाठी गेले होते. सुट्टीवर जाण्याआधी त्यांनी घरमालकाकडे घरात झुरळ, किडे यांचा त्रास असल्याची तक्रार केली होती आणि कीटकनाशकाची फवारणी करण्यास सांगितले होते.

वाचा- बॉक्सिंग-अमित पंघाल सेमीफायनलमध्ये दाखल, भारताचे

संबंधित घरमालकाने घरात कीटकनाशकाची फवारणी केली. विनोद कुमार आणि कुटुंबिय सोमवारी पहाटे ५.३० ला केरळवरून घरी परतले. तिघांना थोडावेळ झोप घेतली. साडेसात वाजता आहानाला त्रास होऊ लागला. तिचा घसा खवखवात होता आणि अंगाला खाज होत होती. आहानाने ही गोष्ट आई-वडिलांना सांगितले. विनोद आणि निशा यांना देखील तसाच त्रास होत होता.

थोड्यावेळेत या तिघांनाही उटली होऊ लागली. साडेअकराच्या सुमारास सर्वांना शेजारी असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुपारी उपचारादरम्यान आहानाचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूचा आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे. वडील विनोद कुमार शुद्धीवर आले आहे. मात्र आई अद्याप धक्क्यातून सावलील नसल्याचे डॉक्टरांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

वाचा- कोण आहे तुलिका मान? दोन वर्षाची असताना वडिलांची हत्या; आईच्या एका निर्णयाने आज देशाला मिळाले

या घटनेची माहिती अहानाच्या मावशीने पोलिसांना दिली. घरमालकाविरुद्ध आयपीसी कलम ३०४A आणि ३३७ अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. ही कलम निष्काळजीपणामुळे मृत्यू किंवा हाणी घडवून आणल्या संंबंधी आहे.

दरम्यान पोलिसांनी घरमालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून कीटकनाशकाची १०० मिलीची बाटली सापडली आहे. संबंधित कीटकनाशक कीटकांबरोबरच कापूस, भात आणि तेलबिया या पिकांच्या लागवडीसाठी वापरले जाते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: