भारताच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची मोठी चिंता अखेर मिटली
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा आणि पाचवा सामना अमेरिकेत होणार आहे. पण या दोन सामन्यांसाठी रोहित आणि द्रविड यांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला नव्हता. बाकीच्या भारतीय खेळाडूंना मात्र व्हिसा देण्यात आला होता. त्यामुळे रोहित आणि द्रविड यांची चिंता वाढेलली होती. त्यामुळे रोहित आणि द्रविड काल संघातील अन्य खेळाडूंना सोडून गयाना येथे अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी गेले होते. जर व्हिसा मिळाला नाही तर भारतीय खेळाडू अमेरिकेत जाणार तर रोहित आणि द्रविड वेस्ट इंडिजमध्येच राहणार, असे चित्र निर्माण होऊ शकले असते. पण गयाना येथे गेल्यावर रोहित आणि द्रविड यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागली. त्यासाठी बीसीसीआयने त्यांची मोठी मदत केली. रोहित आणि द्रविड यांनी सर्व कारगपत्र दिल्यावर अखेर त्यांना अमेरिकेचा व्हिसा देण्यात आला आहे. त्यामुळे आता रोहित आणि द्रविड यांच्यासह भारतीय संघ अमेरिकेत खेळणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन क्रिकेट सामेन आता अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवण्यात येतील. या दोनपैकी भारताने जर एक सामना जरी जिंकला तरी त्यांना मालिका जिंकता येणार आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. जर वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला तर मालिकेत २-२ अशी बरोबरी होईल आणि दोन्ही संघांना मालिका विजयाची संधी असेल.