गुंतवणुकदार झाले मालामाल; फक्त २० दिवसात ६१८ रुपयांचे झाले २ लाख!


नवी दिल्ली: दिर्घ काळात मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger return) देणारे अनेक शेअर्स असतात. पण एका रात्रीत किंवा कमी काळात गुंतवणुकदारांना मालामाल करणारे शेअर्स फार कमी असतात. अशाच एका शेअरने सध्या गुंतवणुकदारांची भरपूर कमाई करून दिली आहे.

एएमटीडी डिजिटल या फार चर्चेत नसलेल्या शेअरने १५ जुलै रोजी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रवेश केला होता. या कंपनीच्या IPOची किंमत ७.८ डॉलर म्हणजे जवळपास ६१८ रुपये इतकी होती. पण त्यानंतर कंपनीचा शेअर रॉकेटच्या वेगाने पुढे गेला. मंगळवारी त्याची किंमत २ हजार ५५५ डॉलर म्हणजे २ लाख ०२ हजार ७२८ रुपये इतकी आहे.

आयपीओ आल्यानंतर या शेअरच्या स्टॉकमध्ये ३२ हजार ६०० टक्के इतकी वाढ झाली आहे. हॉगकॉन्गच्या या कंपनीचे मार्केट कॅप आता वॉलमार्ट, प्रॉक्टर अँन्ड गँबल, जेपी मॉर्गन आणि अन्य दिग्गज कंपन्यांच्यावर गेले आहे.

वाचा- अदानी देणार सर्वांना धक्का; आता जगातील टॉप-३ शी भिडणार

अर्थात बुधवारी या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आणि तो १ हजार १०० डॉलरवर बंद झाला. सध्या शेअर इश्यू प्राइसच्या १४ हजार ५०० टक्केवर आहे. एएमटीडी डिजिटल कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना अशा काळात खुश केले जेव्हा रशिया-युक्रेन युद्ध, महागाई, मंदी सारख्या नकारात्मक वृत्तामुळे गुंतवणुकदारांमध्ये अस्वस्थता होती.

काही लोकांच्या मते AMTD Digitalच्या शेअर्समध्ये आलेली तेजी मीम स्टॉक्समुळे आहे. मीम स्टॉक्स अशा शेअर्सना म्हटले जाते जे सोशल मीडियाच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणुकदारांमध्ये लोकप्रिय होतात.

वाचा- ९० दिवसानंतर तुम्हाला मिळणार आनंदाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या किमती ५ रुपयांनी घसरणार, जाणून घ्या कारण

मंगळवारी या कंपनीचे वॅल्यू ३०० अब्ज डॉलरच्या वर गेले होते. याचा अर्थ मार्केट वॅल्यू ()चा विचार करता या कंपनीने अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे. यात चीनची दिग्गज कंपनी अलीबाबाचा देखील समावेश आहे. बुधवारी शेअर्सच्या किंमतीत ३० टक्के घसरण झाली असली तरी अजून देखील त्याचे बाजार मूल्य अमेरिकेतील दिग्गज कंपनी Disney पेक्षा अधिक आहे. बाजार मुल्याचा विचार करता ही कंपनी जगातील १३व्या क्रमांकाची बाजार मूल्य असलेली कंपनी आहे.

AMTD Digitalने नेस्ले, सॅमसंग, बॅक ऑफ इंडिया, कोका कोला आणि अलीबाबा सारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे. मंगळवारी शेअर जेव्हा तेजीत होता तेव्हा त्याचे बाजार मूल्य एडॉबी, वॉल्ट Disney,एक्सेंचर, मॅकडॉनल्ड्स, सिस्को, नायके, वेरिजॉन या कंपन्यांपेक्षा दुप्पट होते.

वाचा- मंदी येतेय; आर्थिक निर्णय घेताना घ्या काळजी, पाहा दिग्गज कंपन्या काय करत आहेत

AMTD Digitalचा व्यवसाय अनेक क्षेत्रात आहे. यात डिजिटल फायनान्स सर्व्हिस, डिजिटल मीडिया, कंटेंट आणि मार्केटिंग, स्पाइडरनेट आदींचा समावेश आहे. फेब्रुवारीपर्यंत कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या ५० इतकी होती. ही कंपनी कमिशन घेऊन स्टार्टअप कंपन्यांना कर्ज आणि सेवा देते. एप्रिल २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल २.५ कोटी डॉलर इतकी होती. शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे कंपनीने गुंतवणुकदारांचे आभार व्यक्त करणारे पत्र लिहले आहे. यात त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की आयपीओनंतर कंपनीच्या व्यवसाय आणि ऑपरेटिंगमध्ये बदल झालेला नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: