तुमच्या मालकीची एकापेक्षा जास्त घरं आहेत? मग हे वाचाच, तुम्हीही येऊ शकता IT च्या रडारवर


मुंबई : तुम्ही ती जाहिरात पाहिलीच असेल, ज्यामध्ये शाहरुख खान म्हणतो, “छोटा हो या बडा, तुमचं घर तुमचंच आहे.” ते खरे देखील आहे. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न असते. काही लोक त्यांच्या कारकिर्दीत घर बांधतात, तर काही जण निवृत्तीनंतर एकरकमी पैसे देऊन घर खरेदी करतात.

पण, भारतीय कायद्यानुसार तुम्ही किती घरे विकत घेऊ शकता किंवा ठेवू शकता हे देखील तुम्हाला माहीत असले पाहिजे. काहींना वाटतं की घरात ठेवलेले पैसे आणि सोन्याप्रमाणे घरांच्या संख्येवरही काही मर्यादा नाही? तर आज आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

वाचा – स्वस्त विमान प्रवासाची संधी; राकेश झुनझुनवाला यांची कंपनी ‘या’ मार्गावर उड्डाणे सुरू करणार

काय आहेत नियम
गुंतवणुकीशी संबंधित तज्ज्ञांनुसार तुमच्याकडे किती घरे आहेत किंवा तुम्हाला किती घरांवर गृहकर्जाचा लाभ घ्यायचा आहे याकडे आयकर विभाग लक्ष देत नाही. पण याबाबत काही काही नियम आहेत, जे पाळणे प्रत्येक नागरिकास बंधनकारक आहे.

रोख आणि सोन्याचे नियम इथेही लागू होतात. समजा एखाद्याच्या नावावर पाच किंवा १० घरे नोंदणीकृत असतील तर त्यांची कायदेशीर तपासणी होऊ शकते. येथेही त्याला त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांचा तपशील द्यावा लागेल किंवा ही घरे त्याच्याकडून वारसाहक्काची आहेत हे सिद्ध करावे लागेल. पण जर त्या व्यक्तीचे उत्पन्नाचे स्रोत योग्य असतील आणि पैसे त्याने योग्य पद्धतीने दिले असतील तर त्याला काळजी करण्याची गरज नाही.

वाचा – घरात किती तोळे सोनं, रोख रक्कम ठेवता येते? जाणून घ्या आयकर विभागाचे नियम

किती घरांवर कर सूट मिळेल
एखादी व्यक्ती कितीही घरे खरेदी करू शकते आणि ठेवू शकते, परंतु त्याला फक्त दोन स्वत:च्या ताब्यात असलेल्या घरांवर कर सूट मिळेल. जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना घर दिले असेल तर ते घरही स्वत:च्या मालकीचे मानले जाते. अशा प्रकारे, कर कायद्यानुसार तुम्ही कितीही घरांसाठी गृहकर्ज परतफेडीसाठी कर सूट घेऊ शकता.

मात्र, येथे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की एखाद्या व्यक्तीसाठी ८०सी अंतर्गत जास्तीत जास्त १.५० लाख रुपयांवरच कर सवलत मिळते. जर तुम्ही तुमच्या घरांसाठी १० लाख रुपये वार्षिक परतफेड करत असाल तर तुम्हाला फक्त १.५० लाख रुपयांवर सूट मिळेल. तसेच परतफेडीव्यतिरिक्त दिलेले व्याज २ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर देखील करपात्र आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या दोन्ही घरांसाठी २ लाख रुपयांचा कर वाचवू शकता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: