शिंदे गटातील आमदार अस्वस्थ?, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या होणार हायहोल्टेज बैठक


मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक ५० आमदारांची उद्या बैठक होत आहे. उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत या आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती आहे. आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत बिघडल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यानंतरही उद्या मुख्यमंत्री शिंदे बैठक घेत असल्याने सर्वांचं लक्ष आता या बैठकीकडे असणार आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी अचानक दिल्लीला रवाना झाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचं बोललं जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा मोठा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून शिंदे समर्थक आमदारांसमोर आहे. आता याबाबत मुख्यमंत्री शिंदे हे आमदारांना माहिती देणार असल्याची चर्चा आहे. प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात विकास कामं करावी लागतात. पण मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने अनेकांसमोर अडचणी आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ५० आमदारांची बैठक होणार आहे, असं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?, आमदारांची घालमेल वाढली

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाहीए. यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. तसंच भाजप आणि शिंदे समर्थक आमदारांची बैठक होऊन बरेच दिले झाले आहेत. यामुळे मतदारसंघातील विकासकामं, आमदारांमध्ये असलेली चलबिचल आणि सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांमधील अस्वस्थता दूर करून त्यांच्यात विश्वास निर्माण करतील, असं बोललं जातंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, डॉक्टरांकडून सक्तीच्या विश्रांतीचा सल्लाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: