२३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान, कधी लागणार निकाल? वाचा संपूर्ण अपडेट्स


मुंबई : राज्यातील विविध १५ जिल्ह्यांमधील ६२ तालुक्यातील २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे ७८ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाने २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची २९ जून २०२२ रोजी घोषणा केली होती. त्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत.

आज प्रत्यक्षात २३८ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले. सर्व ठिकाणी मतमोजणी ५ ऑगस्ट २०२२ म्हणजे उद्या होणार आहे.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या :-

नाशिक – ३६, धुळे – ४१, जळगाव – २०, अहमदनगर – १३, पुणे – १७, सोलापूर – २५, सातारा – ७, सांगली – १, औरंगाबाद – १६, बीड – १३, परभणी – २, उस्मानाबाद – ९, जालना – २७, लातूर – ६, आणि बुलडाणा – ५ असे एकूण २३८ ग्रामपंचायतीचे मतदान आज पार पडले आहे.

विविध जिल्ह्यांत निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या :-

नाशिक : बागलाण – १३, निफाड – १, सिन्नर – २, येवला – ४, चांदवड – १, देवळा – १३ आणि नांदगाव – ६

धुळे : धुळे – २, साक्री – ४९ आणि शिंदखेडा – १

जळगाव : रावेर – १२, अमळनेर – १, एरंडोल – २, पारोळा – ३ आणि चाळीसगाव – ६

अहमदनगर : अहमदनगर – ३, श्रीगोंदा – २, कर्जत – ३, शेवगाव – १, राहुरी – ३ आणि संगमनेर – ३

पुणे : हवेली – ५, शिरुर – ६, बारामती – २, इंदापूर – ४ आणि पुरंदर – २

सोलापूर : सोलापूर – २, बार्शी – २, अक्कलकोट – ३, मोहोळ – १, माढा – २, करमाळा – ८, पंढरपूर – २, माळशिरस – १ आणि मंगळवेढा – ४

सातारा : कराड – ९ आणि फलटण – १

सांगली : तासगाव – १

औरंगाबाद : औरंगाबाद – १, पैठण – ७, गंगापूर – २, वैजापूर – २, खुलताबाद – १, सिल्लोड – ३, जालना – ६, परतूर – १, बदनापूर – १९ आणि मंठा – २

बीड : बीड – ३, गेवराई – ५ आणि अंबेजोगाई – ५

लातूर : रेणापूर – ४, देवणी – १ आणि शिरूर अनंतपाळ – ४

उस्मानाबाद : तुळजापूर – २, कळंब – १, उमरगा – ५, लोहारा – २ आणि वाशी – १

परभणी : सेलू – ३

बुलढाणा : खामगाव – २ आणि मलकापूर – ३

एकूण – २७१Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: