सामंतांनंतर भरत गोगावले निशाण्यावर, पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी


मुंबई: शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समरर्थकांमधील वाद आता रस्त्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. दोनच दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात जमावाकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांना आणि त्यांना मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर आता गोगावलेंनाही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी आता अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा –आम्हाला भिडू नका, तुमच्याही गाड्या आहेत, आम्हीही फोडू, सामंतांवरील हल्ल्यानंतर शिंदे गट आक्रमक

गेल्या दोन दिवसांपासून धमकीचे फोन

गेल्या दोन दिवसांपासून धकमीचे कॉल येत आहेत. अनोळखी नंबरवरुन हे कॉल येत आहेत. गेल्या काही दिवसांत बाबांनाही या नंबरवरुन कॉल आले होते. आम्हाला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदे गटात सामील झाल्याने या धमक्या येत आहेत, अशी माहिती भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांनी दिली आहे.

तुमच्याही गाड्या आहेत, आम्हीही फोडू, सामंतांवरील हल्ल्यानंतर गोगावलेंची प्रतिक्रिया

हा आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत सातत्याने गाडी फोडण्याची भाषा केली जात होती. मात्र अखेर आज प्रत्यक्षात हल्ला करण्यात आला आहे. आम्हीही शांत बसणार नाही. आम्हाला भिडू नका, तुमच्याही गाड्या आहेत, आम्हीही फोडू शकतो, अशी संतप्त प्रतिक्रिया भरत शेठ गोगावले यांनी दिली आहे.

हेही वाचा –हा भ्याड हल्ला, ही मर्दानगी नाही; सामंतांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निशाणा

उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची २ ऑगस्ट रोजी पुण्यात सभा होती. या सभेनंतर आदित्य ठाकरे आणि बंडखोर नेते उदय सामंत काही क्षण एकमेकांसमोर आले. उदय सामंत हडपसरकडून कात्रज कोंढवा रोडने कात्रज चौकात आले. त्याच वेळी आदित्य ठाकरेंचा ताफा त्याच चौकाकडे येत होता. त्यामुळे शिवसैनिकांची प्रचंड मोठी गर्दी चौकात झाली होती. यातील काही शिवसैनिकांनी उदय सामंतांची गाडी ओळखली आणि गाडीला घेराव घातला. गद्दार गद्दार… अशा घोषणा देत उदय सामंत त्यांच्या गाडीला घेराव घातल्याने पोलिसांनी गाडीला सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा –कुणीतरी सुपारी देऊन माझ्यावर हल्ला करायला सांगितला, उदय सामंतांचा सनसनाटी आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंकर मठात जाणार असल्याने उदय सामंतांना तिथे पोहोचायचे होते. मात्र, शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याने त्यांची गाडी वेगळ्या दिशेने वळवण्यात आली. यावेळी पाठीमागून जाऊन काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीची काच फोडली.

कात्रज चौकात आदित्य आणि उदय सामंत आमनेसामने, शिवसैनिकांनी घेराव घातला, गाडीही फोडलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.