निष्ठेचे दुसरे नाव…; मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात झळकलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा


ठाणे : सगळ्यांचेच लक्ष केंद्रीत करणारे बॅनर ठाण्यात ठीक ठिकाणी लागलेले पाहायला मिळाले आहे. या बॅनरच्या माध्यमातून महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या बंडखोर शिवसैनिकांना अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे. माजी गृहनिर्माण मंत्री तथा कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात आणि कळवा मुंब्रा परिसरात बॅनर लावण्यात आले आहे. आव्हाडांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलेल्या मजकुरामुळे बॅनरची शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

निष्ठेचे दुसरे नाव जितेंद्र आव्हाड… असे लिहिलेले बॅनर सध्या ठाणे शहरात ठिकठिकाणी झळकलेले पाहायला मिळाले आहे. माजी गृहनिर्माण मंत्री तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात तसेच कळवा मुंब्रा परिसरात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनरमध्ये अशा प्रकारचा मजकूर लिहिण्यात आला आहे. या बॅनरच्या माध्यमातून महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या ठाण्यातील शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावण्यात आला आहे.

निष्ठेचे दुसरे नाव…; मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात झळकलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेला वैचारिक वादातून रामराम ठोकत बंड पुकारला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटाला समर्थन दिले. मात्र या बंडानंतर शिंदे गटातील अनेक समर्थकांना गद्दार नाव ठेवण्यात आले. त्यानंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात लागलेल्या बॅनरवर निष्ठेचे दुसरे नाव डॉ. जितेंद्र आव्हाड असे लिहून हा टोला शिंदे समर्थकांना लगावण्यात आला की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.

ठाणेकरांसाठी खुशखबर… या तारखेला कळव्याचा तिसरा खाडीपूल होणार खुला

जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाला लागलेल्या बॅनरमुळे आता पुढील काळात ठाण्यात बॅनर वॉर पाहायला मिळणार अशी चिन्ह आहेत. कारण आता ठाण्याताल दहीहंडी उत्सव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. दहीहंडी आणि गणेसोत्सवासह ठाणे महापालिका निवडणुकीवेळी हे बॅनर वॉर रंगण्याची चिन्ह आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात होणार ‘थर’थराट!, २१ लाखांच्या बक्षीसाची घोषणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: