राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या टियर-२ खात्यासाठी नियम बदलले; असे असतील नवे नियम


वृत्तसंस्था, नवी दिल्लीः राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत (एनपीएस) उघडण्यात आलेल्या टियर-२ प्रकारच्या खात्यांमध्ये खातेदाराल यापुढे क्रेडिट कार्डाच्या साह्याने रक्कम भरता येणार नाही. पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) टियर-२ खात्यांसाठी क्रेडिट कार्डांचा वापर रक्कम भरण्यासाठी करण्यास मनाई केली आहे.

एनपीएसचा बदलला नियम

– टियर-२ प्रकारच्या पेन्शन खात्यांमध्ये संबंधित खातेदाराला त्याच्या क्रेडिट कार्डाच्या साह्याने योगदान भरता येणार नाही.

– यासंदर्भात पीएफआरडीएकडून ३ ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी.

– टियर-१ प्रकारच्या खात्यांमध्ये क्रेडिट कार्डांच्या साह्याने योगदान भरण्यास अनुमती कायम

– बदललेला नियम पीएफआरडीएकडून देशभरात लागू

पीएफआरडीचे परिपत्रक

– पीएफआरडीए कायदा,२०१३ च्या कलम १४ अंतर्गत हे परिपत्रक काढले गेले आहे

– प्राधिकरणाने सर्वानुमते टियर-२ खात्यांसाठी क्रेडिट कार्डाने रकमेचा भरणा करण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

– या नव्या नियमाचे तत्काळ पालन करणे सर्व पॉइंट ऑफ प्रेझेन्सना (पीओपी) बंधनकारक

– यापुढे सर्व पीओपी टियर-२ खात्यांसाठी क्रेडिट कार्डाने पैसे स्वीकारणार नाहीत

– सभासदांच्या भल्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

– या निर्णयामुळे राष्ट्रीय पेन्शन योजनेचे नियमन करणे, या योजनेला प्रोत्साहन देणे तसेच तिचा सुनियंत्रित विकास करणे पीएफआरडीएला शक्य होणार आहे

टियर-१ खात्यांसाठी सुविधा कायम

– एनपीएसमधील टियर-१ प्रकारच्या खात्यांत क्रेडिट कार्डाच्या साह्याने रकमेचा भरणा करता येणार आहे.

– क्रेडिट कार्डच्या साह्याने रकमेचा भरणा करणाऱ्या खातेदारांना पेमेंट गेटवे शुल्क ०.६० टक्के द्यावे लागणार

टियर-२ खाते म्हणजे काय?

एनपीएस अंतर्गत पेन्शन खात्यांचे टियर-१ व टियर-२ असे दोन प्रकार आहेत. यापैकी टियर-२ खाते हे इच्छुकाला स्वेच्छेने उघडता येते. टियर-१ प्रकारचे खाते असलेल्या एनपीएस सभासदालाही टियर-२ प्रकारचे खाते उघडता येते. यामध्ये टियर-२ प्रकारचे खाते असलेल्या पेन्शन खातेधारकाला या खात्यातील रकमेसाठी कर वजावट मिळत नाही. मात्र टियर-१ खात्यातील रकमेसाठी कर वजावट मिळते. टियर-२ खाते केव्हाही बंद करता येते तसेच त्यातून रक्कम काढण्याचे नियम टियर-१ खात्याच्या मानाने लवचिक असतात. ज्यांच्याकडे टियर-१ खाते असेल त्यांना टियर-२ खाते उघडता येते. हे खाते किमान एक हजार रुपयांनी उघडता येते. त्यानंतर खातेधारकाला २५० रुपयांच्या पटीत कितीही रक्कम टियर-२ खात्यात भरता येते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: