पाकिस्तानात असलेले १२०० वर्षांपूर्वीचे प्राचीन हिंदू मंदिर अखेर अतिक्रमणमुक्त; हिंदूंनी केला धार्मिक सोहळा
मंदिरावर अधिकार सांगणाऱ्या ख्रिस्ती कुटुंबाने हिंदू धर्माचा स्वीकार केल्याचा दावा केला आहे. गेल्या २० वर्षांपासून त्यांच्याकडून वाल्मीकी समाजातीलच लोकांना पूजेसाठी परवानगी देण्यात येत होती. ‘ईटीपीबी’चे प्रवक्ते आमिर हाश्मी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वाल्मीकी मंदिराचे औपचारिक उद्घाटन बुधवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला जवळपास १०० हिंदूंसह काही शीख, ख्रिस्ती आणि मुस्लिम बांधवही उपस्थित होते. मंदिर ताब्यात आल्यानंतर हिंदू समाजाने प्रथमच धार्मिक सोहळा आणि तीर्थप्रसादाचे आयोजन केले.
येत्या काही दिवसांमध्ये वाल्मीकी मंदिराची जागा कायदेशीर पद्धतीने ताब्यात आल्यानंतर मंदिराचा जीर्णाोद्धार करण्यात येणार आहे, असेही हाशमी यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबरी मशिदीच्या पाडावानंतर १९९२मध्ये सशस्त्र जमावाने वाल्मीकी मंदिरावरही हल्ला केला होता. त्या वेळी मंदिरातील देवांच्या मूर्तींचे नुकसान झाले होते.