रवींद्र जाडेजाचं ठरलंय? चेन्नई सुपरकिंग्जला अलविदा करण्याची चिन्हं, ‘या’ कारणामुळे चर्चा


मुंबई : आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज हा नेहमीच तगडी झुंज देणारा संघ म्हणून ओळखला जातो. या संघातील सर्वच खेळाडू अगदी दमदार कामगिरी बजावत असल्याने आयपीएल विजेतेपद आपल्या नावावर करण्यासाठी कायमच प्रबळ दावेदार मानले जातात. पण आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज दरवर्षीप्रमाणे वाहवा मिळवत नव्हता. या संघाचा कर्णधार आणि भारताचा ऑल राउंडर खेळाडू रवींद्र जडेजा याच्यासाठी ही आयपीएल फारच निराशाजनक ठरली. आयपीएलच्या १५ व्या सीझनला सुरुवात होण्याआधी धोनीने चेन्नई सुपरकिंग्जचे कर्णधारपद सोडल्यानंतर जडेजाला संघाचा कर्णधार घोषित केले, पण जडेजा कर्णधार पद स्वीकारल्यानंतर आपली कमाल दाखवू शकला नाही आणि त्यानंतर त्याने सीझन सुरू असतानाच आपले कर्णधारपद सोडले.

या विवादानंतर रवींद्र जडेजा चेन्नई सुपरकिंग्जच्या कॅम्पमध्ये न परतण्याच्या मनस्थितीत दिसून येत आहे. त्यामुळे पुढील आयपीएल सीझन सुरू होण्याआधी जडेजा लिलावासाठी उतरण्याची पूर्ण शक्यता आहे. जडेजा आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. त्यानंतर जडेजाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन गेल्या दोन वर्षातील आयपीएल सीझनच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासंबंधित असलेल्या सर्व पोस्ट काढून टाकल्या. सोबतच जडेजाला जेव्हा चेन्नई सुपरकिंग्ज संघाविषयी प्रश्न विचारला तेव्हा त्याने भारतीय संघासाठीच्या आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे सांगत त्याने तो प्रश्न टाळला.

हेही वाचा : भारताच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची मोठी चिंता अखेर मिटली

रिप्लाय केला डिलिट

जडेजाच्या सध्याच्या नवीन सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या पोस्टला दिलेला रिप्लाय सुद्धा डिलिट केला आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये चेन्नई सुपरकिंग्जने जडेजाचा पिवळ्या जर्सीमधील फोटोंचा कोलाज बनवून तो पोस्ट केला होता आणि चेन्नई सुपर किंग्जसाठी जडेजाच्या एका दशकाच्या आयपीएल कारकिर्दीला दाखवत शीर्षक दिले होते की, ‘सुपर जड्डूची १० वर्षे’ ट्विटरवर या पोस्टवर प्रतिक्रिया देत जडेजाने फक्त चार शब्दात लिहिले की, ‘१० वर्ष आणि..’ परंतु जडेजाने हा रिप्लाय डिलिट केला आहे.

जडेजा २०१२ पासून चेन्नई सुपर किंग्जसोबत

चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएल २०१२ च्या लिलावामध्ये जडेजाला संघामध्ये घेतले होते. तेव्हापासून जडेजा या संघाचा भाग बनून राहिला आहे. या चेन्नई सुपर किंग्जमधील एका दशकासोबतच जडेजाने या संघासोबत दोन विजेतेपद जिंकली आहेत. तर जडेजाने स्वतःला देखील एक उत्तम ऑलराउंडर म्हणून स्थापित करण्यास यशस्वी ठरला. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावामध्ये या फ्रेंचाइजीने ३१ वर्षीय जडेजाला १६ करोड रुपयांमध्ये संघाकडे कायम ठेवले आहे.

हेही वाचा : Live सामना अर्धवट सोडून गेल्यानंतर रोहित शर्माने दिली पहिली प्रतिक्रीया, म्हणाला…

सध्या वेस्टइंडिज दौर्‍यावर जडेजा

आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज हा संघ कर्णधार जडेजाच्या नेतृत्त्वाखाली आठ पैकी सहा सामन्यांमध्ये पराभव झाला. जडेजाने या खेळांदरम्यान आपला फॉर्म देखील गमावला आणि कर्णधार असतानाही त्याने फक्त १११ धावा आणि ३ विकेट घेण्यात यशस्वी ठरला. सध्या जडेजा वेस्टइंडिज संघाविरुद्धच्या टी २० मालिकेमध्ये खेळण्यात व्यस्त आहे.

हेही वाचा : भारताला एकहाती विजय मिळवून दिल्यावर सूर्यकुमार यादवसाठी आली गूड न्यूज, पाहा काय घडलं…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: