भावाच्या अंत्यसंस्कारासाठी आला अन् जीव गमावून बसला; २४ तासांत कसं नेमकं काय घडलं?


बलरामपूरः उत्तर प्रदेशमधील बलरामपूर भागात एक विचित्र घटना समोर आली आहे. भवनियापुर गावात २४ तासांत दोन भावांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं कुटुंब हादरले आहे. तर, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.

२ ऑगस्ट रोजी अरविंद मिश्र यांना सापाने दंश केला होता. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. अरविंद मिश्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी लुधियानायेथून बुधवारी त्यांचा लहान भाऊ गोविंद मिश्र हा आला होता. अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर तो त्यांच्या नातेवाईकांसोबत घरीच थांबला होता.

वाचाः मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखाचा होणार; पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय, सोमवारपासून होणार लागू

बुधवारी रात्री झोपेत असताना एका विषारी सापाने गोविंद मिश्रा आणि नातेवाईक चंदशेखर पांड्ये यांना दंश केला. दोघांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे त्याचा गोविंद मिश्रा यांचा मृत्यू झाला. तर, चंद्रशेखर पांड्ये यांची हालत नाजूक आहे.

वाचाः मुंबईकरांना ‘बेस्ट’ भेट; आगारात वॅले व सेल्फ पार्किंग अॅपद्वारे करता येणार

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री सचिवालय आणि वन विभागाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली. तसंच, आमदार कैलाश नाथ शुक्ला यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सरकारकडून कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य मिळेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

वाचाः बलात्कारातून जन्मलेल्या मुलाने २७ वर्षानंतर घेतला आईचा शोध; जन्मदात्या बापाला घडवली जन्माची अद्दलSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: