मंदीचा मोठा परिणाम; जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनीकडून नोकरी कपात
सीएनएनच्या अहवालानुसार, वॉलमार्ट २०० कॉर्पोरेट कर्मचार्यांना कमी करण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने सांगितले की येत्या काही दिवसात कंपनीचा नफा कमी होऊ शकतो. या कंपनीचा अधिकांश भांडवलाचा भाग वॉल्टन कुटुंबाजवळ आहे, हे कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब मानले जाते.
वॉलमार्टने एका निवेदनात कर्मचार्यांची संख्या कमी करण्याबाबत पुष्टी करत म्हणाले ते त्यांच्या संरचनेमध्ये सुधारणा करत आहेत आणि कंपनीला भविष्यासाठी तयार करत आहेत. कंपनीने संगितले की ते अजूनही ई-कॉमर्स जाहिरात आणि सप्लाय चैन सारख्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. एका सूत्राने दिलेल्या महितीनुसार कंपनीने या आठवड्यात कर्मचार्यांना कामावरून कमी करण्याची सुरुवात केली होती.
यापूर्वी कंपनीने गेल्या आठवड्यात संगितले होते की, दुसर्या तिमाहीत नफ्याच्या अंदाजात कपात केली आहे.
वाचा – ऐन महागाईत कर्जाचा हप्ता आणखी वाढणार; आरबीआयचे पतधोरण जाहीर
कपात का करावी लागते?
अन्न आणि इंधनाच्या किमती वाढल्याने ग्राहकांच्या खर्चावर देखील त्याचा परिणाम झाल्याचा कंपनीने सांगितले आहे. यामुळे कंपनीला कपड्यांसह अनेक वस्तूंच्या किमतीमध्ये कपात करावी लागली आहे. यासोबतच वॉलमार्टने इशारा दिला आहे की, वर्षाच्या दुसर्या सहामाहीत ग्राहकांच्या खर्चातही घट होऊ शकते. त्यामुळे दुसर्या तिमाहीत तसेच संपूर्ण वर्षासाठी त्याचा नफा कमी राहू शकतो. वॉलमार्ट ही कमाईच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.
वाचा – तुमच्या मालकीची एकापेक्षा जास्त घरं आहेत? मग हे वाचाच, तुम्हीही येऊ शकता IT च्या रडारवर
वॉल्टन कुटुंबाची वॉलमार्टमध्ये ४७ टक्के हिस्सेदारी आहे. वॉलमार्टची स्थापना १९६२ मध्ये सॅम वॉल्टन यांनी केली होती. त्यांचा संपूर्ण व्यवसाय डिस्काउंट कल्चरवर आधारित होता आणि यामुळेच मंदीच्या काळातही त्यांचा स्टॉक नेहमीच पुढे राहिला. परंतु यावर्षी कंपनीचे शेयर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. वॉल्टन कुटुंबाची एकूण संपत्ती आता सुमारे 200 अब्ज झाली आहे. यंदा त्यात सुमारे ११ टक्क्यांनी घट झाली आहे.