या अँगलनं काढ! फोटोच्या नादात तरुण उंचावरून कोसळला; दगडांवर आदळत धबधब्यात पडला
man falls into waterfall: तमिळनाडूच्या कोडाईकनालमध्ये धबधब्याजवळ फोटो काढून २८ वर्षांचा तरुण खाली कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. खाली कोसळलेल्या तरुणाचा एक मित्र व्हिडीओ शूटिंग करत होता. त्याच व्हिडीओमध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली. ३ ऑगस्टला ही घटना घडली.
व्हिडीओमध्ये अजय कोडाईकनाल येथील धबधब्याजवळ जाताना दिसत आहे. त्याच्या मागे धबधबा दिसत आहे. पुढे ये आणि चांगल्या अँगलनं फोटो काढ, अशी सूचना अजय मित्राला देतो. धबधब्याची खोली फोटोत दिसावी या हेतूनं अजय मित्राला सूचना करतो. तितक्यात ओल्या दगडांवरून अजयचा पाय घसरतो आणि तोल जाऊन तो खाली कोसळतो. दगडांचा आधार घेऊन अजय स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यात अपयशी ठरतो आणि ३ ते ४ सेकंदांत दिसेनासा होतो.
धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्यानं अजय वाहून जातो. त्याचा मित्र मदतीसाठी आरडाओरडा करतो. मात्र काहीच उपयोग होत नाही. घटनेची माहिती कल्याणसुंदरमनं पोलिसांना दिली. त्यानंतर बचाव दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना बराच वेळ शोधकार्य केलं. मात्र त्यांना अजयला शोधण्यात अपयश आलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.