सणासुदीला गृहिणींसाठी मोठी बातमी! खाद्यतेलाच्या किंमती ‘इतक्या’ रुपयांनी कमी होणार


नवी दिल्ली : सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईतून काहीसा दिलासा मिळू शकतो. येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार खाद्यतेल प्रोसेसर आणि उत्पादकांनी जागतिक किमतीतील घसरणीचा फायदा ग्राहकांना देण्याची तयारी केली आहे. अहवालानुसार कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किमती १० ते १२ रुपयांनी कमी करण्याचे मान्य केले आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, जागतिक किमतीतील नरमाईच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकाच्या तेल उत्पादकांनी खाद्यतेलाच्या किमती १० ते १२ रुपयांनी कमी करण्याची तयारी दाखवली आहे.

वाचा – Lay off News: मंदीचा मोठा परिणाम; जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनीकडून नोकरी कपात

भारत खाद्यतेलाचा मोठा आयातदार देश
भारत हा खाद्यतेलाचा आयात करणारा मोठा देश आहे कारण तो आपल्या खाद्यतेलापैकी दोन तृतीयांश आयात करतो. रशिया-युक्रेन युद्ध आणि इंडोनेशियाने इतर देशांना पामतेल निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे अलिकडच्या काही महिन्यांत किंमती झपाट्याने वाढल्या.

वाचा – गरब्याभोवतीही GST चा फेर, पारंपरिक पोशाखांवर भरभक्कम जीएसटी, नागरिकांचा संताप

१५० रुपयांच्या वर किमती
खाद्यतेलाचे दर अजूनही १५० रुपयांच्या वर आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शेंगदाणा तेलाची किंमत सध्या १८७.५५ रुपये प्रति लिटर आहे. महिनाभरापूर्वी ते १८७.८८ रुपये प्रति लिटर होते. तसेच मोहरीचे तेल १७३.९ रुपये प्रति लिटर आहे जे महिन्यापूर्वी १७८.३२ रुपये होते. याशिवाय वनस्पती तेलाचा भाव १५५.२ रुपये असून महिनाभरापूर्वी तो १६३ रुपये होता.

वाचा – महागाईचा झटका; रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात वाढ; जाणून घ्या तुमच्या कर्जाचा EMI किती वाढणार

जागतिक बाजारपेठेत किमती कमी झाल्या
काही दिवसांपूर्वी इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत घट झाली आहे. या घडामोडींनंतर खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होण्यास वाव असल्याचे सरकारचे मत आहे.

ग्राहकांना तात्काळ लाभ मिळणार
वितरकांनी देखील तात्काळ किंमत कमी करण्याची गरज आहे, असा सल्लाही केंद्राने दिला आहे. जेणेकरुन किमतीतील घसरण ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा संकोच न करता तात्काळ दिली जाईल. जेव्हा जेव्हा उत्पादक/रिफायनर्सद्वारे वितरकांना किंमती कमी केल्या जातात तेव्हा त्याचा लाभ ग्राहकांना त्वरित दिला गेला पाहिजे. तसेच या संदर्भात विभागाला नियमितपणे माहिती द्यावी. ज्या कंपन्यांनी त्यांच्या किमती कमी केल्या नाहीत आणि त्यांची MRP (मूळ किंमत) इतर ब्रँडपेक्षा जास्त आहे आणि त्यांनाही त्यांच्या किमती कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: