नवऱ्यासाठी ३ गर्लफ्रेंड हव्यात, पगार ३२ हजार महिना; पत्नीची पोस्ट व्हायरल, कारण वाचून थक्क व्हाल
महिलेने टिकटॉकवर यासंबंधी व्हिडिओ जारी करून याबद्दल सांगितले आहे. याआधी तिच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितले होते की, ती तीन महिलांच्या शोधात आहे, ज्या तिच्या पती, मुले आणि घराची काळजी घेऊ शकतील.
इतकंच नाहीतर तिने जाहिरातीमध्ये लिहलं की, ज्या महिला यासाठी अल्पाय करतील त्यांना HIV टेस्ट करणं आवश्यक आहे. यासाठी तिने ३०-३५ वर्षांची वयोमर्यादा ठेवली होती. यामध्ये महिलांना राहणं, खाणं मोफत असेल. या महिलेची अजब जाहिरात सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नवऱ्याला मिळाली पहिली गर्लफ्रेंड…
महिला म्हणाली की ती नैराश्याशी झुंज देत आहे आणि ती त्यामुळे ती पतीला आनंदी ठेवू शकत नाही. अशात व्हिडिओमध्ये महिेलेने सांगितले की, तिच्या कुटुंबात सध्या पतीसह आणखी एक पत्नी असेल. आम्ही एकाच घरात एकत्र राहू, एकत्र खाऊ आणि एकमेकांची काळजी घेऊ.