कुठं घोडं पेंड खातंय हेच कळायला मार्ग नाही; शिंदे सरकारवर अजित पवारांनी डागली तोफ


बारामती : विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यापासून राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर गेल्या काही दिवसांपासून टीकेची झोड उठवली आहे. आज बारामती येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. यशवंतराव चव्हाण यांनी जो महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, त्या महाराष्ट्रामध्ये एक मे, १९६० पासून आजपर्यंत कधीही असे झालेले नव्हते. ते दुर्दैवाने आज घडत आहे. याची नोंद जबाबदार नागरिक व राज्याचे सहकार्य नात्याने घेतली पाहिजे, असे सांगतानात अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याबाबत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. (opposition leader ajit pawar criticizes shinde govt)

शिंदे सरकारवर टीका करताना अजित पवार पुढे ते म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी अद्याप खातेवाटप केलेले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. कुठं घोडं पेंड खातंय हेच कळायला मार्ग नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आम्ही राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना भेटत आहोत. प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर त्यांना ही सांगत आहोत. मागील एक महिन्यांपासून एखाद्या विभागातील काम करायचं म्हटलं तर अधिकाऱ्यांनाही काही समजत नाही. अशी सध्याची अवस्था झाली असल्याचे पवार यांनी सांगितले.

काँग्रेसने मैदानात उतरवला सबसे बडा खिलाडी; सुरेश कलमाडींची १० वर्षांनंतर पुणे महापालिकेत एन्ट्री
विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले.मात्र त्यांनी अद्याप खातेवाटप केली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. कुठे घोडं पेंड खातंय हे कळायला मार्ग नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आम्ही राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना भेटतोय प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर त्यांना ही सांगतोय मागील एक महिन्यांपासून एखाद्या विभागातील काम करायचं म्हटलं तर अधिकाऱ्यांनाही काही समजत नाही अशी सध्याची अवस्था झाली असल्याचे पवार यांनी सांगितले.

पवार पुढे म्हणाले, पावसाळी अधिवेशन नेहमी जुलै महिन्यामध्ये असते. आता ऑगस्ट सुरू झाला असताना त्यांना मुहूर्त मिळेना की कुठून ग्रीन सिग्नल मिळेना का…त्यांच्या एक वाक्य तर होईना मंत्रिमंडळ करायला ते कशाला घाबरतात हे समजायला मार्ग नाही. असे म्हणत पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत करण्यासाठी तात्काळ मंत्रिमंडळ स्थापन करून अधिवेशन बोलवून मदत करण्यात यावी असे राज्यपालांना भेटून सांगितल्याचे पवार म्हणाले.

मंगळवारी शेवटचं पाहिलं, आज कुजलेला मृतदेह; पुण्यात FTII हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू
राज्यात ठीकठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.पिकांमध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला आहे.त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.मनुष्यहानीसह पशुधनाची हानी झाल्यास घरांची पडझड झाली आहे.रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या सारखे पाऊल उचलण्याचा मनस्थितीत आहेत. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीत पत्रकारांची बोलताना सांगितले.

पुणेकर आता हवेत उडणार, माणसाला घेऊन भरारी घेणारा ड्रोन तयार
राज्याचे पोलीस आयुक्त परमविर सिंग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर ठाकरे सरकारच्या काळात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, यासंदर्भात मला काही माहिती नाही. मी कालपासून दौऱ्यावर आहे. राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून पूर्ण माहिती घेऊन याबाबत बोलणे जास्त उचित ठरेल. राज्यकर्ते बदलत असतात. सरकारमध्ये काम करत असताना कायदा, नियम, संविधानाच्या अधीन राहून प्रत्येकाने काम केले पाहिजे, या विचाराचा मी आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: