भारताचे अमेरिकेतील दोन्ही ट्वेन्टी-२० सामने नेमके किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ…


नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील उर्वरीत दोन सामने अमेरिकेत खेळवण्यात येणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघांतील वनडे आणि ट्वेन्टी-२० सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आले होते. पण आता दोन सामने अमेरिकेत होणार असून ते नेमके किती वाजता सुरु होतील, याची माहिती समोर आली आहे.

वाचा-भारत आणि वेस्ट इंडिजचे सामने अमेरिकेत का खेळवणार, जाणून घ्या यामागचं खरं कारण…

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा आणि पाचवा ट्वेन्टी-२० सामना आता अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये होणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची वेळ ही रात्री ८.०० अशी ठरवण्यात आली होती. पण आता उर्वरीत दोन सामने वेस्ट इंडिजमध्ये नाही तर अमेरिकेत होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही सामन्यांच्या वेळा बदलेल्या असतील, असे सर्वांनाच वाटत होते. पण आत्ता यापुढचे दोन्ही सामने हे अमेरिकेत होणार असले तरी वेळेत मात्र कोणताच बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पुढील दोन्ही सामने हे भारतीय वेळेनुसार रात्री ८.०० वाजताच सुरु होणार आहे. या दोन्ही सामन्यांचा टॉस हा संध्याकाळी ७.३० वाजता होईल आणि त्यानंतर अर्ध्या तासाने सामने सुरु होणार आहेत. त्यामुळे सामने जरी अमेरिकेत असले तरी सामन्यांच्या वेळेत मात्र कोणताच बदल होणार नाही.

वाचा-भारताच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची मोठी चिंता अखेर मिटली

वेस्ट इंडिजमध्ये तर दुसरा आणि तिसरा सामना उशिरा सुरु झाला होता. वेस्ट इंडिजमध्ये तर दुसरा ट्वेन्टी-२० सामना तब्बल तीन तास उशिराने म्हणजेच रात्री ११.०० वाजता सुरु करण्यात आला होता, तर तिसरा सामना रात्री ९.३० वाजता सुरु झाला होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा ट्वेन्टी-२० सामना हा शनिवारी खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून भारताला मालिका विजय साकाकता येऊ शकतो. कारण आतापर्यंत या मालिकेत तीन सामने झाले आहे. या तीन सामन्यांमध्ये भारताने दोन सामने जिंकले आहेत तर वेस्ट इंडिजला एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताने जर हा चौथा सामना जिंकला तर त्यांना मालिका विजय साकारता येऊ शकतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: