मजूर १०० रुपये काढायला गेला; जनधन बँक खात्यातील बॅलन्स पाहून उडालाच
बिहारी लाल यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. बँक खात्यातील शिल्लक रकमेचा आकडा पाहून कर्मचारी उडालेच. लाल यांच्या खात्यात २७,०७,८५,१३,९८५ रुपये जमा झाल्याचं ब्रँच ऑपरेटरनं सांगितलं. लाल राजस्थानात वीट भट्टीवर मजूर म्हणून काम करतात. त्यांचं दररोजचं उत्पन्न ६०० ते ८०० रुपयांच्या आसपास आहे. पावसामुळे वीट भट्टी बंद असल्यानं लाल सध्या उत्तर प्रदेशातील त्यांच्या घरी आले आहेत.
बँक मित्रानं माझ्या खात्यात असलेली शिल्लक रक्कम तपासली आणि मला आकडा सांगितला. तो ऐकून मला धक्काच बसला. मी त्याला तीन-तीनदा बँक बॅलन्स चेक करायला लावलं. त्यानंतरही माझा विश्वास बसेना. त्यामुळे बँक मित्रानं बँक स्टेटमेंट काढून मला दाखवलं, असं लाल यांनी सांगितलं.
खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचा लाल यांचा आनंद अल्पकाळच टिकला. लाल यांनी त्यांच्या घराजवळील जन सेवा केंद्रात शिल्लक रक्कम तपासून पाहिली. तेव्हा ती १२६ रुपये होती. लाल यांचं खातं तपासून पाहण्यात आलं. त्यात १२६ रुपयेच होते. कदाचित तांत्रिक चुकीमुळे हा प्रकार घडला असावा, असं जिल्हा व्यवस्थापक अभिषेक सिन्हा म्हणाले.