राज्यात पुन्हा ५ दिवस मुसळधार पाऊस होणार; पाहा, कधी, कुठे कोसळणार अतिमुळधार पाऊस!
कोकणात रत्नागिरी जिल्ह्याला ४ ऑगस्टसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील ४ दिवसांसाठी ९ ऑगस्टपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. डोंगरउतारावरील शेती पावसाअभावी अडचणीत सापडली होती. आता सक्रिय झालेल्या पावसाने पुन्हा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- कोकणात मनसेला मोठा दणका; वैभव खेडेकरांविरोधात गुन्हा दाखल, आरोप आहे गंभीर
सध्या जिल्हयात पाऊस सुरू झाला असला तरी पावसाला म्हणावा तसा फारसा जोर दिसत नाही. परंतु, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा पावसाने जोर धरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र पाऊस कमी झाला आहे. तसेच गेले दहा पंधरा दिवस पाऊस न झाल्याने बळीराजा देखील चिंतेत पडला होता. मात्र, आता हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
निर्दयीपणाचा कळस! गर्भवती महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; ६ महिन्याचं अर्भक दगावलं
क्लिक करा आणि वाचा- निर्दयीपणाचा कळस! गर्भवती महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण; ६ महिन्याचं अर्भक दगावलं
कोकणात प्रामुख्याने भात, नाचणी ही शेती पावसाळ्यात केली जाते. लावणीनंतर भातशेतीला पाऊस हवा असतो. हळवी व महान आशा दोन स्वरूपात ही भातशेती केली जाते. पण पावसाने ओढ दिल्याने पाण्याचा पंप लावून शेतीला पाणी लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. याचीच चिंता शेतकरीवर्गाला होती. आता हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! रघुवीर घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प